‘एमपीएससी’ची परीक्षा रविवारी झालीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:26+5:302021-03-13T04:43:26+5:30

आता पुन्हा रद्दचा निर्णय नको आता चौथ्यांदा पुढे ढकललेली एमपीएससीची पूर्व परीक्षा आठवड्याभरात घेतली जाईल. तिची तारीख शुक्रवारी जाहीर ...

The MPSC exam must be held on Sunday | ‘एमपीएससी’ची परीक्षा रविवारी झालीच पाहिजे

‘एमपीएससी’ची परीक्षा रविवारी झालीच पाहिजे

Next

आता पुन्हा रद्दचा निर्णय नको

आता चौथ्यांदा पुढे ढकललेली एमपीएससीची पूर्व परीक्षा आठवड्याभरात घेतली जाईल. तिची तारीख शुक्रवारी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. उद्या जाहीर होणाऱ्या तारखेला कोणत्याही परिस्थितीत परीक्षा घेण्यात यावी. त्यावेळी पुन्हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन परीक्षार्थींच्या जीवनाशी सरकारने खेळ करू नये, अशी प्रतिक्रिया परीक्षार्थी आकांक्षा भोसले हिने व्यक्त केली.

चौकट

ठाम निर्णय घ्यावा

कोरोनामुळे राज्य सरकारला खरंच एमपीएससीची परीक्षा घेणे शक्य नसले, तर यावर्षी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही, असा ठाम निर्णय सरकारने घ्यावा. त्यामुळे विद्यार्थी निर्धास्त होतील. त्यांची मानसिकता बिघडणार नाही. त्यांचा क्लास आणि तयारीचा खर्चही कमी होईल, अशी प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रूझ यांनी व्यक्त केली.

Web Title: The MPSC exam must be held on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.