एमपीएससीचा निकाल :

By admin | Published: April 6, 2016 12:58 AM2016-04-06T00:58:50+5:302016-04-06T00:58:50+5:30

शक्ती कदम, अश्विनी निकम, परितोष कंकाळ, सचिन पाटील, आरती नांगरे उत्तीर्ण

MPSC results: | एमपीएससीचा निकाल :

एमपीएससीचा निकाल :

Next



पुणे/कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१५ चा निकाल जाहीर झाला आहे. त्यात उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत अभिजित नाईक यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, रवींद्र राठोड यांनी द्वितीय, तर अतुल पंडित यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.
त्याचप्रमाणे पोलिस उपअधीक्षक पदाच्या परीक्षेत राहुल धस यांनी प्रथम क्रमांक तर मिलिंद शिंदे यांनी द्वितीय आणि कुणाल सोनवणे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तर आष्टा येथील प्रशांत बाबासाहेब ढोले यांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे.
दरम्यान, अश्विनी सागर निकम (चोकाक, ता. हातकणंगले) यांची कक्ष अधिकारीपदी, कोल्हापूरचे परितोष रवींद्र कंकाळ यांची मुख्याधिकारीपदी, सचिन पाटील (कागल) यांची मुख्याधिकारीपदी निवड झाली आहे. तर शक्ती कदम यांची उपजिल्हाधिकारीपदी राज्यात चौथ्या क्रमांकाने निवड झाली आहे. विवेक जमदाडे, खटाव (गटविकास अधिकारी), अश्विनी गायकवाड, बेलवडे, ता. कडेगाव (मुख्याधिकारी, नगरपालिका), तसेच अर्जुन गिरम, गणेश पाटोळे, ओंकार उत्पात, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरचे आरती नांगरे (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा) यांचा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये समावेश आहे.
उपजिल्हाधिकारी परीक्षेत मुलींमध्ये सुहसिनी गोणेवार यांनी प्रथम तर स्नेहा उबाळे यांनी द्वितीय आणि प्रियंका आंंबेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे विठ्ठल कदम यांनी पाचवा तर उमाकांत पंडित यांनी सहावा क्रमांक मिळविला आहे.‘सर्व्हर डाऊन’मुळे उमेदवारांची निराशा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाला. मात्र, आयोगाच्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन असल्याने निकाल पाहता येत नव्हता; त्यामुळे उमेदवारांची मोठी निराशा झाली. सर्व्हर डाऊन असल्याने नेमके कोणी या परीक्षेत यश मिळविले व यशस्वी उमेदवारांना कोणते पद मिळाले, याचा गोंधळ रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

रोहित काटकर प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी
नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील रोहित रावसाहेब काटकर यांची सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आर.टी.ओ.)पदी निवड झाली. रोहित यांचे प्राथमिक शिक्षण वारणा विद्यानिकेतन, माध्यमिक शिक्षण पारगावच्या पाराशर हायस्कूलमध्ये झाले, तर इस्लामपूरच्या आर.आय.टी.मधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतली. सध्या ते देवगड (सिंधुदुर्ग) येथे गटविकास अधिकारीपदी कार्यरत आहेत.

Web Title: MPSC results:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.