एप्रिलपासून एकही बिल न भरणाऱ्यांची वीज तोडणार, तीन आठवड्यांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:22 AM2021-02-11T11:22:37+5:302021-02-11T11:25:56+5:30
एप्रिलपासून गेल्या दहा महिन्यांत एकही बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा पुढील तीन आठवड्यांत वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश mahavitaran Kolhapur- महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. याचा झटका पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांना बसणार आहे. थकबाकी भरण्यासाठी हप्त्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : एप्रिलपासून गेल्या दहा महिन्यांत एकही बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा पुढील तीन आठवड्यांत वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. याचा झटका पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांना बसणार आहे. थकबाकी भरण्यासाठी हप्त्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीज बिलांच्या थकबाकीसह इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण १९६२ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी १२४७ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या १४ लाख २९ हजार ८११ वीजग्राहकांनी गेल्या १ एप्रिल २०२० पासून एकाही महिन्याचे वीज बिल भरलेले नाही. महावितरणकडून वारंवार प्रत्यक्ष संपर्क साधूनदेखील ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे नाळे यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे व कंसात थकबाकी
- पुणे (१०३२.८० कोटी)
- सातारा (१४०.३६कोटी)
- सोलापूर (२५९.१२ कोटी)
- सांगली (१९२.५४ कोटी)
- कोल्हापूर (३३७.४३ कोटी)
एकदाही बिल न भरलेले ग्राहक
ग्राहक प्रकार संख्या थकबाकी
घरगुती १२ लाख ६८ हजार ४८७ ८५६ कोटी ८१ लाख
वाणीज्यीक १ लाख ३८ हजार ८७० २६४ कोटी ३२ लाख
औद्योगिक २२ हजार ४५४ १२६ कोटी ३५ लाख