वारुळमध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 07:07 PM2021-07-14T19:07:45+5:302021-07-14T19:09:14+5:30

Crimenews Bribe Kolhapur : तीन हजार रुपयेची लाच घेताना महावितरणच्या वारुळ (ता. शाहूवाडी) येथील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले.

MSEDCL junior engineer arrested for taking bribe in Warul | वारुळमध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना अटक

वारुळमध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना अटक

Next
ठळक मुद्देवारुळमध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना अटकरंगेहाथ पकडले : नेट मीटर बसवण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना कारवाई

कोल्हापूर : तीन हजार रुपयेची लाच घेताना महावितरणच्या वारुळ (ता. शाहूवाडी) येथील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले.

मनोज दादाराव भोरगे (वय २५ सद्या रा. शिंदे यांच्या घरी भाड्याने, चनवाड फाटा, मलकापूर. मुळ रा. कल्लाळ, ता. जि. नांदेड) असे अटक केलेल्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्यांचे नाव आहे. ही घटना वारुळ येथील महाविरणच्या कार्यालयात घडली.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत सोलर कनक्शनचे नेट मीटर बसवायचे होते. त्यासाठी तक्रारदार हा वारुळ येथील महावितरणच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्याने तेथील कनिष्ठ अभियंता मनोज भोरगे यांची भेट घेतली.

हे नेट मीटर बसवण्यासाठी अभियंत्यांने त्यांच्याकडे तीन हजार रुपयेची लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली, त्यानुसार पथकाने शहानिशा करुन महाविरतणच्या वारुळ शाखेत सापळा रचला, त्यावेळी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयेची लाच स्विकरताना भोरगे यांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत स.फो.संजीव बंबरगेकर, पो.ना. सुनिल घोसाळकर, पो.ना.कृष्णात पाटील, पो.कॉ. रूपेश माने यांनी केली.
 

Web Title: MSEDCL junior engineer arrested for taking bribe in Warul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.