वारुळमध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:36+5:302021-07-15T04:18:36+5:30
कोल्हापूर : तीन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या वारुळ (ता. शाहूवाडी) येथील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ...
कोल्हापूर : तीन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या वारुळ (ता. शाहूवाडी) येथील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. मनोज दादाराव भोरगे (वय २५ सध्या रा. शिंदे यांच्या घरी भाड्याने, चनवाड फाटा, मलकापूर. मुळ रा. कल्लाळ, ता. जि. नांदेड) असे अटक केलेल्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. ही घटना वारुळ येथील महावितरणच्या कार्यालयात घडली.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत सोलर कनेक्शनचे नेट मीटर बसवायचे होते. त्यासाठी तक्रारदार हा वारुळ येथील महावितरणच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्याने तेथील कनिष्ठ अभियंता मनोज भोरगे यांची भेट घेतली. हे नेट मीटर बसवण्यासाठी अभियंत्याने त्यांच्याकडे तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली, त्यानुसार पथकाने शहानिशा करुन महावितरणच्या वारुळ शाखेत सापळा रचला, त्यावेळी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भोरगे यांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत स.फो.संजीव बंबरगेकर, पो.ना. सुनील घोसाळकर, पो.ना.कृष्णात पाटील, पो.कॉ. रूपेश माने यांनी केली.
फोटो नं. १४०७२०२१-कोल-मनोज भोरगे (आरोपी-एसीबी)
140721\14kol_2_14072021_5.jpg
फोटो नं. १४०७२०२१-कोल-मनोज भोरगे (आरोपी-एसीबी)