‘एमटीडीसी’चे कार्यालय कोल्हापुरातच

By admin | Published: May 28, 2014 12:59 AM2014-05-28T00:59:05+5:302014-05-28T00:59:30+5:30

व्यवस्थापकीय संचालकांची माहिती : सुधारित आदेश काढणार

'MTDC' office in Kolhapur | ‘एमटीडीसी’चे कार्यालय कोल्हापुरातच

‘एमटीडीसी’चे कार्यालय कोल्हापुरातच

Next

कोल्हापूर : महाराष्टÑ राज्य पर्यटन विकास महामंडळाचे कोल्हापूर येथील माहिती व आरक्षण केंद्र पूर्ववत सुरू राहणार असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्याऐवजी येथे पर्यटकांचा प्रतिसाद नसल्याचे भासवत महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी येथील माहिती व आरक्षण केंद्र पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यात महामंडळ अपयशी ठरले असताना त्याचे खापर येथील उत्पन्नावर फोडले जाते. हे कार्यालय बंद करण्याचा घाट अधिकार्‍यांनी घातल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात होता. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणार्‍या घटकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. उद्योग भवनमध्ये एमटीडीसीचे एका कोपर्‍यात कार्यालय होते. त्यांच्याकडून कोल्हापूरचा पर्यटन विकास व्हावा यादृष्टीने कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. त्याचे मूळ कार्यालयच शोधताना घाम फुटत होता. येथील कार्यालयातूनही नुसते बुकिंग होत होते म्हणजे एमटीडीसीच्या दृष्टीने तर ती पैसे मिळवून देणारी ती फक्त खिडकी होती. त्यांना कोल्हापूरच्या पर्यटन विकासाशी काही देणे-घेणेच नव्हते,अशीच परिस्थिती होती, असे असताना हे कार्यालय हलविण्याचा ‘एमटीडीसी’ने निर्णय घेतला होता. येथील जनमानसाची भावना पाहता हे कार्यालय कोल्हापुरातच राहावे, यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. कोल्हापरू व सांगली जिल्ह्णांतील नागरिक, पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सुधारित आदेश काढत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी यांनी पत्रकात म्हटले आहे. हे माहिती केंद्र कंत्राटी कर्मचारी नेमून सुरू ठेवण्याची कार्यवाही प्रादेशिक व्यवस्थापक, पुणे यांनी करावी. त्याचबरोबर कोल्हापूर माहिती व आरक्षण केंद्राचे वित्तीय व लेखाविषयक कामकाज प्रादेशिक कार्यालय, पुणे येथून होणार असल्याचे सोनी यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'MTDC' office in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.