वाहनचालकांचा बेफिकीरपणाच अधिक
By admin | Published: April 24, 2017 01:03 AM2017-04-24T01:03:16+5:302017-04-24T01:03:16+5:30
वाहतूक पोलिसांच्या कारवाईत स्पष्ट : परवाना नसणाऱ्यांची संख्या सर्वाधिक; तीन हजार वाहकांना दंड
एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूर
शहरात वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलत दि. १७ ते १८ एप्रिल या दोन दिवसांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सत्र राबविले. शहरात सुमारे २ हजार ९९९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये ६ लाख ९०० रुपये दंडाची रक्कम वसूल झाली. या कारवाईमध्ये सर्वाधिक वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नसणाऱ्या १२५७ जणांवर कारवाई झाली. त्यापाठोपाठ नियमबाह्ण नंबरप्लेट लावणे ४८७, प्रवेश बंद मार्गातून (एकेरी मार्ग) वाहन चालवणे ३६३ अशा बेफिकीर वाहनचालकांचा समावेश असल्याचे वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून निष्पन्न झाले.
वाहनांची संख्या वाढल्याने शहरासह उपनगरांत वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वाहनधारक नियमबाह्ण वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे चित्र होते.या दोन दिवसांत मोटार व्हेईकल अॅक्टनुसार परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, ट्रिपल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून बिनदिक्कतपणे वावरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली. कागदपत्रांची पाहणी करून नियमबाह्य वाहनचालकांना जाग्यावर २०० ते १ हजार रुपये दंडाची पावती दिली गेली.
अज्ञान मुलांना आवर घाला
अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल त्यांची जीवघेणी ठरत आहे. बेफिकीर पालकही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते. या मुलांच्या ‘धूम स्टाईल’च्या हौसेपुढे पादचारी नागरिकांच्या जिवालाही धोका पोहोचत आहे. पालकांचे दुर्लक्ष, शाळा-महाविद्यालयांत मार्गदर्शनाचा अभाव आदी कारणे कारणीभूत ठरत आहेत.
अठरा वर्षांखालील मुले गाडी चालविताना मिळाल्यास त्यांच्यासह पालकांना हजार रुपये दंड भरावा लागणार तर आहेच, शिवाय अपघात झाल्यास गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात मुलांबरोबर पालकांनाही शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना आवर घालणे गरजेचे आहे.
दोन दिवसांतील कारवाईचा आलेख
वाहन नियम गुन्हेदंड वसूल
रहदारीस अडथळा६६१३२००
लायसन्स नसणे१२५७२५१४००
तिब्बल सीट१०७२१४००
मोबाईल वापरणे४९ ६२००
अस्पष्ट नंबरप्लेट १४१२८२००
नियमबाह्ण नंबरप्लेट४८७४०७००
प्रवेश बंदी३६३५६८००
सिग्नल तोडणे२४४५१६००
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक१२३२४००
कर्णकर्कश हॉर्न वाजविणे४८००
रिक्षा इतरत्र उभी करणे२४००
फिल्मिंग काच लावणे१२००
झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबविणे७७१५४००
विरुद्ध दिशेने वाहन चालविणे१९३८००
पोलिसांचे आदेश न पाळणे५१०००
क्षमतेपेक्षा जास्त माल भरणे ७१४००
‘नो पार्किंग’मध्ये वाहन उभा करणे४८००
वाहनास प्रखर दिवा बसवणे३ ६००
सीटबेल्ट न लावणे५६११२००
इतर११ २८००
पोलिस ठाणे१४९३०३००मोबाईलवर बोलणे टाळले पाहिजे
शासकीय कर्मचारी असो, किंवा महाविद्यालयीन तरुण वाहन चालविताना मोबाईलवर बोलत जाणे ही त्यांची ‘स्टाईल’च बनली आहे. त्यांना वेळीच रोखण्यासाठी पालक किंवा पोलिस प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम म्हणून महाविद्यालयीन तरुणांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येक वाहनचालकाने मोबाईलवर बोलणे टाळले पाहिजे.
वेगाला मर्यादा नाही : शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनधारकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक व्यवस्था म्हणजे शहरातील मोठी समस्या आहे. शासकीय कर्मचारी असो किंवा महाविद्यालयीन तरुण वाहन चालविताना मोबाईलवर बोलत जाणे ही त्यांची ‘स्टाईल’च बनली आहे. काही तरुण सायरन काढून मोटारसायकली सुसाट वेगाने चालवत असतात. काही वेळा ट्रिपल सीटवरून बिनदिक्कतपणे फिरत असतात. शहरातील प्रत्येक वाहनाला वेगमर्यादा घालून दिली पाहिजे.