म्युकरचे १८ रुग्ण बरे, ८१ रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:04+5:302021-06-05T04:19:04+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण १०६ रुग्ण आढळलेले असून १८ जणांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात ...

Mucker cures 18 patients, treats 81 patients | म्युकरचे १८ रुग्ण बरे, ८१ रुग्णांवर उपचार

म्युकरचे १८ रुग्ण बरे, ८१ रुग्णांवर उपचार

Next

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण १०६ रुग्ण आढळलेले असून १८ जणांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे. ८१ रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन उपसंचालक कार्यालयाकडून शासकीय रुग्णालयास तसेच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य

योजनेअंतर्गत म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांना मोफत देण्यात येत आहेत. त्यानंतर उर्वरित इंजेक्शन ही खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी किंमत आकारून वितरित केली जात आहेत. आजअखेर २८३५ इंजेक्शन प्राप्त झाले असून, शासकीय रुग्णालयांना १७२८ व खासगी रुग्णालयांना ११०७ इंजेक्शन वितरित करण्यात आलेले आहेत. महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत येणाऱ्या एकूण सहा खासगी

रुग्णालयामध्ये म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत.

Web Title: Mucker cures 18 patients, treats 81 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.