‘मुधोजी’, ‘संजीवन’ विजयी
By admin | Published: December 24, 2014 11:51 PM2014-12-24T23:51:05+5:302014-12-25T00:02:02+5:30
शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धा
कोल्हापूर : मुधोजी कॉलेज फलटण, संजीवन इंजिनिअरिंग कॉलेज पन्हाळा, के.बी.पी. कॉलेज इस्लामपूर, जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेज या संघांनी शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत पुढील फेरी गाठली.
मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे संजीवन इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे आयोजित आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धेत आज, बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मुधोजी कॉलेजने व्ही. यादव कॉलेज पेठवडगावचा ४-१ ने पराभव केला. मुधोजीकडून विजय पोतेकर व नटराज यांनी प्रत्येकी दोन गोल केले. वडगावकडून केवळ शुभम सुतारने गोल केला. दुसऱ्या सामन्यात संजीवन इंजिनिअरिंगने के.डब्ल्यू.सी. कॉलेज सांगलीचा १-० गोलने पराभव केला. यामध्ये एकमेव विजयी गोल संजीवनकडून रोहित गोनुगडे याने केला.
तिसऱ्या सामन्यात के.बी.पी. कॉलेज इस्लामपूर संघाने विवेकानंद कॉलेजचा ५-४ असा पराभव केला. चौथ्या सामन्यात जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजने छत्रपती शिवाजी कॉलेजचा टायब्रेकरवर २-१ असा पराभव केला.
स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा विभागप्रमुख
पी. टी. गायकवाड, नगरसेवक जगमोहन भुर्के, संजय जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय साळोखे, उमेश बडवे, रणजित इंगवले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)