मुद्रा योजनेचा प्रचार होणार दमदार,प्रसिद्धीसाठी २१ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 03:03 PM2019-09-05T15:03:15+5:302019-09-05T15:04:26+5:30
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून मिळणारे कर्ज, त्याच्या जाचक अटी, परतफेड व वसुलीविषयी अनास्था अशा अनेक प्रश्नांचा गुुंता तयार झाला असताना, शासनाने मात्र योजनेचा प्रचार मात्र दमदार करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ प्रचार प्र्रसिद्धीपासून २१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत प्रचारावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.
कोल्हापूर : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून मिळणारे कर्ज, त्याच्या जाचक अटी, परतफेड व वसुलीविषयी अनास्था अशा अनेक प्रश्नांचा गुुंता तयार झाला असताना, शासनाने मात्र योजनेचा प्रचार मात्र दमदार करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ प्रचार प्र्रसिद्धीपासून २१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत प्रचारावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत समिती सचिव जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने, अशासकीय सदस्य अर्चना रिंगणे, नचिकेत भुर्के, तानाजी ढाले, नामदेव चौगुले, नाथ देसाई यांची उपस्थिती होती.
या योजनेंतर्गत लघू उद्योग उभारू इच्छिणाऱ्यांना बँकांकडून विनातारण कर्ज पुरविले जाते. तथापि या योजनेतून दिल्या गेलेल्या कर्जाची वसुली होत नसल्याने बँकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतला आहे. यासंदर्भात समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा अपेक्षित असताना अधिकाधिक लोकांपर्यंत ही योजना पोहोचविण्यावरच चर्चा झाली; त्यासाठी गावागावांत जाऊन प्रचार करण्याचा निर्णय झाला.
त्याकरिता नगरपंचायती, नगरपरिषद, ग्रामपंचायत आदींच्या माध्यमातून अधिकाधिक प्र्रसिद्धी करण्यासाठी फलक लावण्याचे ठरले. बँकांच्या दर्शनी भागातच फलक लावावेत, असे ठरले. याशिवाय होर्डिंग्ज, रेडिओ, टी. व्ही. आणि वर्तमानपत्रे आदींच्या माध्यमातून जाहिरात करण्याचेही ठरले. हे सर्व करण्यासाठी २१ लाखांचा निधीही शासनाकडून प्राप्त झाल्याचे समन्वय समिती सचिवांनी बैठकीत सांगितले.
मुद्रा योजनेतून २0१७ पासून वाटप झालेल्या कर्जाची माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने यांनी दिली. त्यानुसार २0१७ मध्ये ३१ हजार १0२ लाभार्थ्यांना ६२१ कोटी ७६ लाख, २0१८ मध्ये ३६ हजार ८१३ लाभार्थ्यांना ६३९ कोटी ४ लाखांचे तर २0१९ मध्ये १९ हजार ५५५ लाभार्थ्यांना १५३ कोटी ९३ लाखांचे कर्ज आतापर्यंत वितरीत करण्यात आले आहे.