मुडशिंगी मंडलकडे एकही दाखला प्रलंबित नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:26 AM2021-04-08T04:26:02+5:302021-04-08T04:26:02+5:30
कोल्हापूर : मुडशिंगी येथील मंडल अधिकाऱ्यांकडे वेळच्या वेळी दाखले निर्गत केले जातात. त्यामुळे आजअखेर एकही दाखला प्रलंबित नाही, अशी ...
कोल्हापूर : मुडशिंगी येथील मंडल अधिकाऱ्यांकडे वेळच्या वेळी दाखले निर्गत केले जातात. त्यामुळे आजअखेर एकही दाखला प्रलंबित नाही, अशी माहिती मुडशिंगीच्या मंडल अधिकारी अर्चना गुळवणी यांनी दिली.
मुडशिंगी मंडलअंतर्गत ऑनलाईन फेरफारही मंडल अधिकारी यांच्याकडून रोज निर्गत केले जात असल्याने ते विहित मुदतीत निर्गत केले जात आहेत. या मंडलाअंतर्गत ३१ मार्चअखेर ११९ टक्के वसुली झाली असून फेरफार निर्गतीमध्ये मंडलाची कामगिरी उत्तम झाली आहे. गौण खनिज कारवाईअंतर्गत ५ लाख २५ हजार इतका दंडही वसूल केला आहे. मौजे हलसवडे गावठाण विस्तारवाढअंतर्गत वाटप झालेल्या प्लाॅटधारकांची सन १९७९ पासून सात-बारा पत्रकी नाव लावण्याबाबत प्रलंबित संपूर्ण १३१ प्लाॅट्सचे पंचनामे केले आहेत. त्यातील पात्र १०० प्लाॅटधारकांची नावे सात-बारा पत्रकी लावण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. या मंडलामध्ये सात गावे समाविष्ट आहेत. मंडल अधिकारी प्रत्येक मंगळवारी मुडशिंगी येथे उपस्थित राहतात. त्यादिवशी महत्त्वाचे काम निघाल्यास दुसऱ्यादिवशी उपस्थित राहून कामाची निर्गती केली जात असल्याचे गुळवणी यांनी म्हटले आहे.