सरनाईक वसाहतीतील खड्डा मुजवावा : नगरसेविकेचा उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 03:58 PM2020-01-18T15:58:08+5:302020-01-18T16:46:22+5:30
कोल्हापूर येथील बुुध्दगार्डन प्रभागातील सरनाईक वसाहतमध्ये मोठा अनाधिकृत खड्डा पाडला आहे, हा खड्डा न मुजविल्यास सोमवारपासून महापालिकेसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा नगरसेविका वहिदा फिरोज सौदागर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कोल्हापूर : येथील बुुध्दगार्डन प्रभागातील सरनाईक वसाहतमध्ये भूषण गांधी (रा. सम्राटनगर) यांनी रि.स. नं. ६२३/ए, ६२४/२ या मिळकतीमध्ये २०१७ मध्ये मोठा अनाधिकृत खड्डा पाडला आहे, ते न मुजविल्याने त्याचा परिसरातील नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे हा खड्डा न मुजविल्यास सोमवारपासून महापालिकेसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा नगरसेविका वहिदा फिरोज सौदागर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सौदागर म्हणाले, गांधी यांनी दोन वर्षापूर्वी जागेत अनाधिृकत मोठा खड्डा पाडून ठेवल्याने तेथे साचलेले पाणी दुषीत बनले आहे. त्यामुळे परिसरात निरनिराळ्या साथीच्यारोगांचा प्रादुर्भाव वाढले आहे. परिसरात वाढलेल्या डेंग्यूच्या साथीला हा खड्डाच कारणीभूत असल्याची लोकभावना झाली आहे.
या खड्याशेजारी महापालिकेच्या उर्दू शाळेची इमारत असल्याने येथे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या अनाधिकृत खड्यांबाबत नगररचना आणि पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पण त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पहिलेले नाही. त्यामुळे हा खड्डा नागरीकांच्या जीवाशी खेळल्याचा प्रकरत आहे.
या खड्यामुळे प्रभागात मुलभूत सोयी पुरवण्यातही अडचणी येत असल्याने हा खड्डा मुजवावा आणि भूषण गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास उद्या, सोमवारपासून महापालिकेसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा नगरसेविका वहिदा सौदागर यांनी दिला.
याववेळी फिरोज सौदागर, अस्लम मुल्ला, नूरमहमद सरकवास, आसिफ मुजावर , मौसीन फरास आदी उपस्थित होते.