मुजोर ठेकेदाराची कनिष्ठ अभियंत्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 11:37 AM2020-11-03T11:37:26+5:302020-11-03T11:39:23+5:30

muncipaltyCarporaton, Crimenews, kolhapurnews महापालिकेचे घेतलेले काम वेळेवर केले नाही ते नाहीच, शिवाय वरिष्ठांकडे तक्रार का केलीस, नोटीस का काढलीस म्हणून एका मुजोर ठेकेदाराने कनिष्ठ अभियंत्यास मारहाण करण्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माळकर तिकटी चौकात घडला. भररस्त्यात या ठेकेदाराने अभियंत्याचे कपडे फाडले, मास्क फाडला. विशेष म्हणजे यावेळी उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांच्या समोर ही घटना घडली.

Mujor contractor beats junior engineer | मुजोर ठेकेदाराची कनिष्ठ अभियंत्यास मारहाण

मुजोर ठेकेदाराची कनिष्ठ अभियंत्यास मारहाण

Next
ठळक मुद्देमुजोर ठेकेदाराची कनिष्ठ अभियंत्यास मारहाण भरचौकात वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर कपडे फाडले

 कोल्हापूर : महापालिकेचे घेतलेले काम वेळेवर केले नाही ते नाहीच, शिवाय वरिष्ठांकडे तक्रार का केलीस, नोटीस का काढलीस म्हणून एका मुजोर ठेकेदाराने कनिष्ठ अभियंत्यास मारहाण करण्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माळकर तिकटी चौकात घडला. भररस्त्यात या ठेकेदाराने अभियंत्याचे कपडे फाडले, मास्क फाडला. विशेष म्हणजे यावेळी उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांच्या समोर ही घटना घडली.

सुनील शरवर असे या मुजोर ठेकेदाराचे नाव असून त्याच्या कामाचा पूर्वानुभव लक्षात घेऊन त्याचे नाव काळ्या यादीत टाकले आहे तरीही तो त्याच्या भावाच्या नावावर कामे घेत असतो. नगरोत्थान योजनेतील एक काम शरवर याने घेतले होते. काम वेळेत केले नाही, म्हणून राजारामपुरी विभागीय कार्यालयाकडील कनिष्ठ अभियंता उमेश बागुल यांनी त्याला नोटीस बजावली होती तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती.

नोटीस काढल्याचा राग मनात धरून शरवर याने सोमवारी सायंकाळी सहा वाजता माळकर तिकटी चौकात उपशहर अभियंता बाबूराव दबडे व उमेश बागुल यांना गाठले. तेथे आधी शाब्दिक वाद घातला नंतर अचानक शरवर याने बागुल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या मारहाणीमुळे बागुल गोंधळून गेले. ह्यतू मला नोटीस काढणारा कोण, माझ्या विरोधात तक्रार का केलीसह्ण याचा जाब शरवर विचारत होता. दबडे यांच्यासह आजबाजूच्या नागरिकांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला.

ही घटना घडल्यानंतर महापालिकेच्या सर्व अभियंत्यांची बैठक राजारामपुरी विभागीय कार्यालयात झाली. त्यात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला, तसेच फिर्याद देण्याचे ठरले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे काम सुरू होते. सर्व अधिकारीही तेथे उपस्थित होते.

ब्लॅकलिस्ट असूनही काम कसा करतो?

सुनील शरवर याच्याबद्दल बऱ्याच तक्रारी आहेत. त्याचे काम बरोबर नसल्याने त्याला महानगरपालिका प्रशासनाने ब्लॅकलिस्ट केले आहे तरीही त्यांने त्याच्या भावाच्या नावावर नगरोत्थान योजनेतील काम घेतले आहे. जर भावाने काम घेतले असेल तर शरवर काम कसे करतो, याचा विचार अधिकाऱ्यांनी का केला नाही. त्याला कोणी पाठीशी घालत होते का, असे प्रश्न सोमवारच्या प्रकारामुळे समोर आले आहेत.

राजकीय दबाव

गुन्हा दाखल होऊ नये म्हणून एका राजकीय पक्षाचे शहराध्यक्ष अधिकाऱ्यांना विनंती करत होते. शरवर हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल होतोय म्हटल्यावर त्याने राजकीय दबाव आणण्यास सुरुवात केली.

Web Title: Mujor contractor beats junior engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.