निसर्ग मित्रने दिल्या सफाई कर्मचाऱ्यांना बहुगुणी शेवग्याच्या शेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 02:18 PM2020-04-08T14:18:35+5:302020-04-08T14:21:01+5:30
निसर्ग मित्र संस्थेच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांना बहुगुणी शेवग्याच्या शेंगा व इतर पदार्थ यांचे वाटप करण्यात आले.
कोल्हापूर : येथील निसर्ग मित्र संस्थेचा ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या मंगेशकर नगर प्रभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना भविष्यातील आरोग्य उत्तम राहावे यासाठी खिचडी भात, बहुगुणी शेवगा, व वनस्पतीजन्य खाद्य रंगाची पाकिटे भेट देण्यात आली.
यावेळी संस्थेचे सदस्य अनिल चौगुले यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना स्वच्छता विषयी शास्त्रीय माहिती, परिसरातील कचरा व्यवस्थापन, साप्ताहिक नियोजन कसे करावे, तसेच स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी घरगुती व नैसर्गिक उपाय समजून सांगितले.
यावेळी आहारामध्ये बहुगुणी शेवग्याचे आणि वनस्पतिजन्य रंगाचे महत्त्व व उपयोग याविषयीही त्यानी सविस्तर माहिती दिली.
यावेळी संस्थेचे सदस्य अजित पाटील यांच्या हस्ते पौष्टिक खिचडी, भात, टोमॅटो, सॅलड, पळसाच्या पत्रावळीमधून स्वच्छता कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी शेवग्याच्या शेंगा व वनस्पतीजन्य रंग यांचेहीवाटप करण्यात आले. यावेळी प्रभागातील सीमा जोशी, दत्तात्रय साळोखे, वरद पाटील, भूमी कदम, देवानंद कांबळे, आदी उपस्थित होते.