‘बीएएमएस’च्या वैद्यकीय अधिकाºयांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 07:18 PM2017-10-06T19:18:40+5:302017-10-06T19:18:47+5:30
कोल्हापूर : नीती आयोगातील एम. सी. आय. एस. एम. २०१७ या प्रस्तावित विधेयकात योग्य ती दुरुस्ती करावी आणि बी.ए.एम.एस. डॉक्टरांचे अॅलोपॅथी प्रॅक्टिसचे अधिकार कायम राहावेत,
कोल्हापूर : नीती आयोगातील एम. सी. आय. एस. एम. २०१७ या प्रस्तावित विधेयकात योग्य ती दुरुस्ती करावी आणि बी.ए.एम.एस. डॉक्टरांचे अॅलोपॅथी प्रॅक्टिसचे अधिकार कायम राहावेत, या मागणीसाठी कोल्हापुरात शुक्रवारी वैद्यकीय अधिकाºयांनी मूक मोर्चा काढला. यावेळी वैद्यकीय अधिकारी काळ्या फिती लावून मोर्चात सहभागी झाले होते. या प्रस्तावित विधेयकाच्या निषेधार्थ अधिकाºयांनी वैद्यकीय सेवा एक दिवस बंद ठेवली होती.
केंद्र शासनाने नीती आयोग स्थापन केला आहे. त्यामध्ये एम.सी.आय.एस.एम. हे विधेयक प्रस्तावित आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर विद्यमान तरतुदीपैकी केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषद कायदा १९७० आणि महाराष्ट्र वैद्यक व्यवसायिक अधिनियम १९६१ नुसार भारतीय चिकित्सा पद्धतीच्या बी. ए. एम. एस. डॉक्टरांच्या अॅलोपॅथीची औषधे वापरण्याच्या कायदेशीर अधिकारावर गदा येण्याची भीती आहे. त्यामुळे नीती आयोगाच्या या विधेयकात दुरुस्ती करावी, या मागणीसाठी शुक्रवारी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) दसरा चौकातून मोर्चाचे आयोजन केले होते. संघटनेचे विभागीय सचिव डॉ. यशपाल हुलस्वार, ‘निमा’चे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, आदींच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकाºयांचा मोर्चास सुरुवात झाली. नागाळा पार्क येथून निघालेल्या या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे विसर्जन झाले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाºयांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले.
मोर्चात डॉ. अशोक वाली, डॉ. अरुण मोराळे, डॉ. हरीश नांगरे, डॉ. दिलखुष तांबोळी, डॉ. सचिन चौगुले, डॉ. शिवानंद पाटील, ‘निमा,’ करवीरचे अध्यक्ष डॉ. अभिजित मुळीक, सेक्रेटरी डॉ. आदित्य काशीद, खजानिस डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. हृषिकेश जाधव, डॉ. प्रदीप रावत, डॉ. प्रदीप चौगुले यांच्यासह जिल्'ातील बी. ए. एम. एस. वैद्यकीय अधिकाºयांचा सहभाग होता.
कोल्हापुरात शुक्रवारी बी. ए. एम. एस. वैद्यकीय अधिकाºयांनी विविध मागण्यांसाठी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. या मोर्चात असंख्य वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.वैद्यकीय अधिकाºयांच्या कोल्हापुरातील मूक मोर्चात महिला-युवती मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.