पोलिसांचा पोशाख घालून मुंबईच्या इसमाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:38 AM2020-12-16T04:38:57+5:302020-12-16T04:38:57+5:30

मुरगूड : मुंबईतून घरगुती कामा निमित्त कोल्हापूर मध्ये आलेल्या विक्रम श्रीपती तांबे यांच्याबरोबर ओळख निर्माण करून त्यांची फसवणूक केल्याची ...

Mumbai's Isma cheated by wearing police uniform | पोलिसांचा पोशाख घालून मुंबईच्या इसमाची फसवणूक

पोलिसांचा पोशाख घालून मुंबईच्या इसमाची फसवणूक

Next

मुरगूड : मुंबईतून घरगुती कामा निमित्त कोल्हापूर मध्ये आलेल्या विक्रम श्रीपती तांबे यांच्याबरोबर ओळख निर्माण करून त्यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.पोलिसांचा पोशाख परिधान केलेल्या युवकाच्या मदतीने तीन ते चार युवकांच्या टोळक्यांनी मुरगूडमध्ये जमीन घेऊन देतो म्हणून सुमारे अडीच लाख रुपये घेऊन पोबारा केला. चित्रपटाला शोभेल अशा घडलेल्या या घटनेने हवालदिल झालेल्या तांबेंनी नागरिकांची मदत घेत मुरगूड पोलीस स्टेशन गाठले. यामधील आरोपी पोलीस असल्याचे तांबेंनी तक्रारीत सांगितले आहे. त्यामुळे मुरगूड पोलीस युद्धपातळीवर तपास करत आहेत.

घडलेली घटना अशी मुंबई अंधेरीतील विक्रम तांबे हे आपलं भाचा सागर साठे याला मुलगी पाहायला कोल्हापूर येथे मागील महिन्यात आले होते. ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते तिथे भाग्यश्री देशमुख नावाच्या नात्यातील युवतीबरोबर आलेला अभय पाटील(खोटे नाव) नावाच्या तरुणाबरोबर ओळख करून दिली. सदरचा तरुण जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो, असे खोटे सांगितले. दरम्यान त्या दिवसापासून अभय हा तांबे यांच्याशी फोनवरून कायम संपर्कात होता.

बारा डिसेंबर ला अभयने फोन करून तांबेना मुरगूड येथे एक जागा असल्याचे सांगून येताना आगाऊ रक्कम घेऊन या व्यवहार करूया, असे सांगितले. त्यानुसार तांबे आपला भाचा सागर याला घेऊ दोन लाख साठ हजार रुपये घेऊन कोल्हापूरकडे निघाले ते तेरा तारखेला अभयला कागलमध्ये भेटले व तिथून ते मुरगुड आले. मुरगूड स्टँडवरती त्यांनी सागर येथेच थांबूदे आपण जागा पाहू असे सांगून रिक्षातून निपाणी राधानगरी रस्त्यावर असणाऱ्या दत्त सभागृहा जवळ नेले. तिथे अगोदरच जागामालक म्हणून खोटा इसम उभा होता तेथील जागा दाखवून आगाऊ रक्कम द्या आपण लगेच करारपत्र करू, असे अभय यांनी सांगितल्याने त्यांनी ती सर्व रक्कम त्या खोट्या जागामालकाकडे दिली व ते दोघे चालत मुरगूड स्टँडकडे जाऊ लागले.

इतक्यात मोटारसायकलवरून पोलीस ड्रेस घातलेले दोन तरुण तिथे आले त्यांनी अभयला जोरात काठीने मारहाण करून गाडीवर घालून घेऊन गेले. त्यामुळे तांबे गोंधळलेल्या अवस्थेत तिथेच थांबले शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या मदतीने मुरगूड पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दिली. सपोनि विकास बडवे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Mumbai's Isma cheated by wearing police uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.