मुंबईच्या प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Published: February 23, 2016 12:52 AM2016-02-23T00:52:41+5:302016-02-23T00:52:41+5:30

तरुणीचा मृत्यू : तरुणाची प्रकृती चिंताजनक; हातकणंगले येथे विषप्राशन

Mumbai's lover's suicide attempt | मुंबईच्या प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईच्या प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

हातकणंगले : हातकणंगले रेल्वे फाटकाजवळ असणाऱ्या राम मंदिरसमोरील पान टपरीमागे मुंबई येथील सोनी मनीष नीळकंठ (वय ३४) आणि अरुण प्रल्हाद नाईक (३६) या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पे्रयसी सोनी नीळकंठ हिचा मृत्यू झाला, तर अरुण याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, अरुण प्रल्हाद नाईक आणि सोनी मनीष नीळकंठ हे विरार येथून ९ जानेवारीला बेपत्ता झाले होते. सोमवारी पहाटे हातकणंगले येथील इचलकरंजी रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळ राम मंदिरसमोरील पान टपरीमागे अरुण आणि सोनी बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे मॉर्निंगवॉकला आलेल्यांना दिसले. त्यांनी ही माहिती हातकणंगले पोलिसांना दिली. त्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सकृतदर्शनी दिसत होते. दोघेही बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांना त्यांचा पत्ता शोधणे अवघड होते. दोघांशेजारी एक मोबाईल, पाण्याची बाटली व नॅपकीन पडला होता. मोबाईलमधील सीमकार्ड फेकून दिले होते. मात्र, हँडसेटमधील नंबरवरून या दोघांचा पत्ता शोधून पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. तरूणी विवाहित असून, तिला १३ वर्षांचा मुलगा आहे. तिचा पती वसई येथे इस्टेट एजंट असल्याचेही सांगण्यात आले. रात्री उशिरा नातेवाईक हातकणगंले येथे दाखल झाले आहेत. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्यप स्पष्ट झालेले नाही असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Mumbai's lover's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.