मुंबईच्या पावसाचा कोल्हापूरच्या प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 10:29 PM2017-08-29T22:29:02+5:302017-08-29T23:19:47+5:30

कोल्हापूर : मुंबई शहरात सोमवारी (दि. २८) रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचले असल्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया वाहतुकीवर परिणाम झाला आहे

  Mumbai's rains hit Kolhapur passengers | मुंबईच्या पावसाचा कोल्हापूरच्या प्रवाशांना फटका

मुंबईच्या पावसाचा कोल्हापूरच्या प्रवाशांना फटका

Next
ठळक मुद्दे महालक्ष्मी एक्स्प्रेससह लक्झरी बसेस रद्द : प्रवाशांचे हाल मुंबईहूनसुद्धा कोल्हापूरला एकही गाडी निघालेली नाही. खासगी लक्झरी बस वाहतूक चालकांनी मात्र मुंबईला जाणाºया अनेक बसेस रद्द केल्या.

कोल्हापूर : मुंबई शहरात सोमवारी (दि. २८) रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचले असल्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मंगळवारी रात्री येथून मुंबईला जाणाºया महालक्ष्मी एक्स्प्रेस या रेल्वेसह अनेक खासगी लक्झरी बसेस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे आधी आरक्षण केलेल्या प्रवाशांनी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कार्यालयांतील कर्मचाºयांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग घडले.

कोल्हापूरहून मुंबईला रोज रात्री साडेआठ वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेस रेल्वे जाते; तर त्याच वेळी ती मुंबईतील ‘सीएसटी’वरून कोल्हापूरला निघते; परंतु या दोन्ही गाड्या अचानक रद्द करण्यात आल्या. कोल्हापुरातून रात्री साडेदहा वाजता स'ाद्री एक्स्प्रेस मुंबईला जाते. त्या गाडीबाबत मात्र रेल्वेस्थानकाला काहीच सूचना न मिळाल्याने ती नेहमीप्रमाणे सोडण्यात आली.

महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने एस.टी. महामंडळाला कळवून एस. टी. बससेवा देता येते का पहा, म्हणून कळविले. त्यानुसार कोल्हापूर आगाराच्या चार बसेस रात्री आठ नंतर रेल्वेस्थानकावर लावण्यात आल्या. मात्र या बसगाड्यांना फारसे प्रवासी मिळाले नाहीत. एस.टी.तर्फे रात्री इसापूर-मुंबई व कडगाव मुंबई या दोन बसगाड्या सोडण्यात आल्याचे मध्यवर्ती बसस्थानकावरून सांगण्यात आले.
खासगी लक्झरी बस वाहतूक चालकांनी मात्र मुंबईला जाणाºया अनेक बसेस रद्द केल्या.

नाकोडा, घाटगे-पाटील, हमसफर, आदी ट्रॅव्हल्समधून गाड्या रद्द केल्याचे सांगण्यात आले; तर कोंडूसकर ट्रॅव्हल्सने त्यांच्या चार बसगाड्या सायनपर्यंत सोडल्या आहेत. मुंबईत साचलेले पाणी आणि राष्टÑीय महामार्गावर झालेली वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी मुंबईला गाड्या सोडणे रद्द केले. तसेच मुंबईहूनसुद्धा कोल्हापूरला एकही गाडी निघालेली नाही. बस तसेच रेल्वे वाहतूक रद्द झाल्यामुळे प्रवासी वर्गाची मात्र मोठी गैरसोय झाली.

आधी आरक्षण केलेल्या प्रवाशांनी मात्र गाड्या रद्द करू नका म्हणून रात्री काही ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कार्यालयात वाद घातले. कुठे अडकून पडायचे तेथे पडू; पण तुम्ही बसेस सोडा म्हणून प्रवाशांनी आग्रह धरला; तर मुंबई शहरात वाहनांना प्रवेशबंदी केली असल्याने आपण बसेस सोडू शकत नाही, असे ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वादावादीचे प्रसंग घडत होते.

 

Web Title:   Mumbai's rains hit Kolhapur passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.