तिसरी लाट रोखण्यास महापालिका प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:16 AM2021-07-19T04:16:50+5:302021-07-19T04:16:50+5:30

कोल्हापूर : काेरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली असल्यामुळे महापालिका प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. ...

Municipal administration ready to stop the third wave | तिसरी लाट रोखण्यास महापालिका प्रशासन सज्ज

तिसरी लाट रोखण्यास महापालिका प्रशासन सज्ज

Next

कोल्हापूर : काेरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली असल्यामुळे महापालिका प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तिसऱ्या लाटेत विशेषत: लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असल्यामुळे त्यांच्यासाठी महापालिकेने ५० बेड, तर खासगी रुग्णालयात १५० बेडची व्यवस्था केली असून, ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमताही वाढविली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सुटकेचा श्वास घेत असतानाच तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका प्रशासनानेही आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. महापालिका आरोग्य विभागाने आपली यापूर्वीची १८ कोविड सेंटर्समधील तसेच आयसोलेशन हॉस्पिटलमधील यंत्रणा व त्याचा सेटअप तसाच कायम ठेवला आहे. आवश्यकतेनुसार त्यात आणखी वाढ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली असल्यामुळे लहान मुलांवर उपचार करण्याची यंत्रणा तयार करावी लागत आहे. सध्या हॉकी स्टेडियमजवळील कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी ३० बेड, तर आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये २० बेडची तयारी करण्यात आली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयात १५० बेड राखीव ठेवले आहेत.

पालिकेने आपली ऑक्सिजन क्षमता वाढविण्याचा ठरविले असून दहा हजार लिटर क्षमतेची टाकी आयसोलेशन हॉस्पिटलच्या आवारात बसविण्यात आली आहे, ती लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. हॉकी स्टेडियम येथे १००० हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसविली जात आहे.

डॉक्टर्स, नर्सना प्रशिक्षण

लहान मुलांवर उपचार करण्याकरिता पालिकेच्या डॉक्टर स्टाफ यांनी प्रशिक्षण देणे आवश्यक होते. त्यानुसार डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ यांच्याकडून महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहेत, असे प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी सांगितले.

- अशी असेल महापालिकेची यंत्रणा-

- एकूण कोविड सेंटर्स - १८

- ऑक्सिजन बेड - ३५१

- नॉन ऑक्सिजन बेड - १२०३

- व्हेंटिलेटर - १०

- लहान मुलांसाठी बेड -

१. हॉकी स्टेडियम कोविड सेंटर ३०

२. आयसोलेशन हॉस्पिटल - २०

३. खासगी रुग्णालये - १५०

पॉईंटर -

- सायंटिफिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर

- गृह अलगीकरणाचे प्रमाण कमी करणार.

- टेस्टिंग दररोज चार हजारच्या वर करणाार.

- लहान मुलांसाठी आवश्यक असलेले मेडिसिन, इन्स्ट्रुमेंट खरेदी प्रक्रिया सुरू.

Web Title: Municipal administration ready to stop the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.