मुन्सिपलचे आंदोलन नगराध्यक्षांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर : गाडीवडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:27 AM2021-08-26T04:27:39+5:302021-08-26T04:27:39+5:30

बुधवारी त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे, बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर, जसराज ...

Municipal agitation after the role of the mayor became clear: Gadivadar | मुन्सिपलचे आंदोलन नगराध्यक्षांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर : गाडीवडर

मुन्सिपलचे आंदोलन नगराध्यक्षांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर : गाडीवडर

Next

बुधवारी त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे, बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर, जसराज गिरे, दत्ता नाईक, शेरू बढेघर, दिलीप पठाडे, दीपक सावंत व अनिस मुल्ला आदी उपस्थित होते.

विलास गाडीवडर पुढे म्हणाले की, १३ जुलै रोजी नगरपालिकेत सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत ११ व १२ क्रमांकाचे विषय मुन्सिपल हायस्कूल पाडणे व हस्तांतरण करणे हे होते. हे विषय सत्ताधारी गटाने गोंधळात मंजूर केले होते. पण त्यानंतर अद्याप या मंजूर विषयांचे प्रोसिडिंग झालेले नाही. आम्ही वारंवार प्रोसिंडिंग मागूनही आम्हाला ते दिलेले नाही. यामुळे नगराध्यक्षांची भूमिका गुलदस्त्यात आहे. यामुळे आजपासून होणारे आंदोलन नगरपालिकेची व नगराध्यक्षांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Municipal agitation after the role of the mayor became clear: Gadivadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.