महापालिका : घरफाळा दंड व्याजात सवलत, १ कोटी १५ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 02:32 PM2021-01-30T14:32:56+5:302021-01-30T14:35:06+5:30

Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा दंड व्याजात सवलत योजनेतून केवळ तीन दिवसांत १ कोटी १५ लाखांची वसुली झाली आहे. ९४६ मिळकतधारकांनी याचा लाभ घेतला. शुक्रवारी दिवसभरात ५० लाखांची वसुली झाली असून, ४०० मिळकतधारकांनी घरफाळा जमा केला.

Municipal Corporation: Concession in house tax penalty interest, recovery of 1 crore 15 lakhs | महापालिका : घरफाळा दंड व्याजात सवलत, १ कोटी १५ लाखांची वसुली

कोल्हापूर महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी घरफाळा दंड व्याज योजनेची मुदतवाढ करण्याची मागणी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, माजी महापौर निलोफर आजरेकर, शारंगधर देशमुख, सचिन पाटील, अशपाक आजरेकर उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका : घरफाळा दंड व्याजात सवलत, १ कोटी १५ लाखांची वसुली दिवसभरात ५० लाखांची जमा : तीन दिवसांत ९४६ जणांनी घेतला लाभ

कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा दंड व्याजात सवलत योजनेतून केवळ तीन दिवसांत १ कोटी १५ लाखांची वसुली झाली आहे. ९४६ मिळकतधारकांनी याचा लाभ घेतला. शुक्रवारी दिवसभरात ५० लाखांची वसुली झाली असून, ४०० मिळकतधारकांनी घरफाळा जमा केला.

कोरोनामुळे अनेकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेच्या वसुलीवरही परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मिळकतधारकांना सवलत आणि महापालिकेच्या घरफाळ्याची १०० टक्के वसुली होण्यासाठी दंड व्याजात सवलत योजना आणली आहे. ३१ मार्चपर्यंत ७० टक्के दंड व्याजात सवलत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रावर रांगा लागत आहे.
प्रतिक्रिया

सवलत योजनेसाठी नागरी सुविधा केंद्र सुटीदिवशीही सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहणार आहे. दंड व्याजात ७० टक्के सवलत योजना ३१ मार्चपर्यंत असून, नागरिकांनी नागरी सुविधा अथवा ऑनलाईनने घरफाळा जमा करून लाभ घ्यावा.
निखिल मोरे, उपायुक्त, महापालिका

अशी आहे सवलत योजना

  • एक हजार चौरस फुटांवरील मिळकतधारक
  • ३१ जानेवारीपर्यंत घरफाळा जमा केल्यास दंड व्याजात ७० टक्के सवलत
  • २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा जमा केल्यास दंड व्याजात ६० टक्के
  • ३१ मार्चपर्यंत जमा केल्यास दंड व्याजात ५० टक्के सवलत
  • एक हजार चौरस फुटांवरील मिळकतधारक
  • ३१ जानेवारीपर्यंत ५० टक्के, २८ फेब्रुवारीपर्यंत ४० टक्के आणि ३१ मार्चपर्यंत ३० टक्के सवलत

 

Web Title: Municipal Corporation: Concession in house tax penalty interest, recovery of 1 crore 15 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.