कोल्हापूर महापालिकेला मिळाले एक उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त ; सेवेचा श्रीगणेशा कोल्हापुरातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:32 AM2020-02-12T11:32:35+5:302020-02-12T11:35:22+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेला राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर अखेर तीन अधिकरी मिळाले असून, हे दोन्ही अधिकारी लवकरच रुजू होतील, अशी ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेला राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर अखेर तीन अधिकरी मिळाले असून, हे दोन्ही अधिकारी लवकरच रुजू होतील, अशी अपेक्षा आहे.
तिन्ही अधिकारी हे परीविक्षाधीन असून, ते आपल्या सेवेचा श्रीगणेशा कोल्हापुरातून करीत आहेत. मुख्याधिकारी गट ‘अ’म्हणून शासकीय सेवेत दाखल झालेले निखिल बाजीराव मोरे हे उपायुक्त म्हणून तर मुख्याधिकारी गट ‘ब’ म्हणून सेवेत दाखल झालेले अवधूत रवींद्र कुंभार व चेतन किरण कोंडे सहाय्यक आयुक्त म्हणून महापालिकेकडे रुजू होतील.
कोल्हापूर महानगरपालिकेत गेले चार वर्षे दोन उपायुक्त व दोन सहाय्यक आयुक्त यांची पदे रिक्त आहेत. भाजप सरकारच्या काळात राज्य सरकारकडे मागणी करूनही अधिकारी मिळाले नाहीत. प्रत्येक वेळी कोल्हापूर महानगरपालिका सोडून बोला, एवढे शासकीय पातळीवरून सांगितले जात होते. महापालिका आयुक्त, माजी आमदार अमल महाडिक यांनीही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात म्हणून वारंवार पाठपुरावा केला होता. परंतु त्यांच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले होते. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घातले नाही.
दोन उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे त्याचा महापालिकेच्या दैनंदिन कामावर मोठा परिणाम झाला होता. आता परिवीक्षाधीन का असेना तीन अधिकारी मिळाल्याने कामात थोडी सुसूत्रता येईल. अन्य अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.