महापालिका : दीड लाख मिळकती, अधिकृत नळधारक एक लाख दोन हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 05:47 PM2021-02-09T17:47:04+5:302021-02-09T17:56:05+5:30

Muncipalty Carporation Kolhpur- कोल्हापूर शहरात दीड लाख मिळकतीअसून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे मात्र एक लाख दोन हजार ३५८ नळधारक आहेत. दरवर्षी किमान ५० अनधिकृत नळधारकांवर कारवाई केली जात असून प्रत्येकी २५ हजारांच्या दंडासह वापरलेल्या पाण्याचे बिलही घेतले जाते.

Municipal Corporation: One and a half lakh income, one lakh two thousand authorized pipe holders | महापालिका : दीड लाख मिळकती, अधिकृत नळधारक एक लाख दोन हजार

महापालिका : दीड लाख मिळकती, अधिकृत नळधारक एक लाख दोन हजार

Next
ठळक मुद्देमहापालिका : दीड लाख मिळकती, अधिकृत नळधारक एक लाख दोन हजारवर्षाला अनधिकृत ५० नळधारकांवर कारवाई : प्रत्येकी २५ हजारांच्या दंडाची तरतूद

विनोद सावंत

कोल्हापूर : शहरात दीड लाख घरे असून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे मात्र एक लाख दोन हजार ३५८ नळधारक आहेत. दरवर्षी किमान ५० अनधिकृत नळधारकांवर कारवाई केली जात असून प्रत्येकी २५ हजारांच्या दंडासह वापरलेल्या पाण्याचे बिलही घेतले जाते.

शहरामध्ये अनधिकृत नळधारकांकडून महापालिकेच्या पाण्याचा बेसुमार वापर होतो. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. महापालिकेच्या सभागृहात सदस्यांनी वारंवार हे निदर्शनास आणले. वास्तविक थकबाकी असल्यामुळे ज्यांचे कनेक्शन बंद केले, अशा चोरून कनेक्शन घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याचबरोबर इतरही काही घटक चोरून पाणी घेत असून त्यांचे प्रमाण अल्प आहे.
चौकट

कोल्हापूर शहरात इतर महापालिकांच्या तुलनेत अनधिकृत कनेशनची संख्या कमी असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. महापालिका वर्षाला सुमारे ५० अनधिकृत नळधारकांवर कारवाई करते. वॉर्डवाईज २० कर्मचाऱ्यांची ५ पथके तैनात केली असून त्यांच्याकडून तपासणी होते.

निम्म्या पाण्याची गळती

महापालिका रोज उपसा केंद्रातून १२० एमएलडी पाण्याचा उपसा करते. मात्र, बिलिंग ४५ टक्के पाण्याचे होत असून ५० टक्के पाण्याची गळती आणि सुमारे ५ टक्के पाण्याची चोरी होत असल्याचा अंदाज आहे. गळक्या पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन यामुळे पाणी गळतीचे प्रमाण वाढत आहे.

  • शहराची एकूण लोकसंख्या : सुमारे ६ लाख
  • एकूण मिळकती : १ लाख ५० हजार
  • अधिकृत नळधारक : १ लाख २ हजार ३५८



३० कोटींची पाणीपट्टी थकली

पाणीपट्टी विभागाला यंदाच्यावर्षी ६५ कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत केवळ ५० टक्केच वसूल झाले आहेत. तब्बल ३० कोटींची थकबाकी आहे. अशा स्थितीमध्ये पाणीपुरवठा विभागाने ३० टक्के दरवाढीचा प्रस्ताव केला असून नागरिकांतून याला विरोध होत आहे.


महापालिकेकडून अनधिकृत नळधारकांवर कारवाईसाठी चार पथके नियुक्त केली असून नळ कनेक्शन तोडण्याबरोबर कायदेशीर कारवाई केली जाते. एका अपार्टमेंटमध्ये एकच कनेक्शन असते. मात्र, फ्लॅट २० पेक्षा जास्त असतात. याचबरोबर काही व्यावसायिक बोअरचा वापर करतात. चार ते पाच कुटुंबांमध्ये एकच कनेक्शन असते. त्यामुळे मिळकतींची नोंद जास्त आणि नळधारक कमी दिसतात.
- प्रशांत पंडत,
पाणीपट्टी अधीक्षक, महापालिका

Web Title: Municipal Corporation: One and a half lakh income, one lakh two thousand authorized pipe holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.