५० लाखाची परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याचा महापालिकेला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:22 AM2019-03-14T10:22:09+5:302019-03-14T10:23:32+5:30

कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदी प्रदुषणासंदर्भात मार्गदर्शक सुचनांची पूर्तता केल्यासंबंधीचा अहवाल वेळेत सादर केला नाही म्हणून बुधवारी राष्ट्रीयहरित लवादाने कोल्हापूर महानगरपालिका तसेच महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळास प्रत्येकी पाच लाखाचा दंड तसेच महानगरपालिकेला पन्नास लाखाची परफॉर्मन्स गॅरंटी (कामगिरीची हमी) भरण्याचा आदेश दिला. दंडाची तसेच परफॉर्मन्स गॅरंटीची रक्कम केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे भरावी लागणार आहे.

Municipal corporation order to pay 50 lacs performance guarantee | ५० लाखाची परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याचा महापालिकेला आदेश

५० लाखाची परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याचा महापालिकेला आदेश

Next
ठळक मुद्दे५० लाखाची परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याचा महापालिकेला आदेशपाच लाखाचा दंड : राष्ट्रीयहरित लवादाची कारवाई

कोल्हापूर : शहरातील रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदी प्रदुषणासंदर्भात मार्गदर्शक सुचनांची पूर्तता केल्यासंबंधीचा अहवाल वेळेत सादर केला नाही म्हणून बुधवारी राष्ट्रीयहरित लवादाने कोल्हापूर महानगरपालिका तसेच महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळास प्रत्येकी पाच लाखाचा दंड तसेच महानगरपालिकेला पन्नास लाखाची परफॉर्मन्स गॅरंटी (कामगिरीची हमी) भरण्याचा आदेश दिला. दंडाची तसेच परफॉर्मन्स गॅरंटीची रक्कम केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे भरावी लागणार आहे.

दिल्ली येथील राष्ट्रीयहरित लवादासमोर बुधवारी पुणे येथून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. त्यावेळी लवादाने ही कारवाई केली. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने लवादाने केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार कामगिरीचा अहवाल मुदतीत सादर केला नव्हता. त्यामुळे चार न्यायाधिशांच्या लवादाने महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांना प्रत्येकी पाच लाख रुपये दंड तसेच महापालिका प्रशासनास ५० लाखाची परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याचे आदेश दिले.

रंकाळा तलाव प्रदुषणासंदर्भात महानगरपालिकेच्या विरोधात राष्ट्रीयहरित लवादासमोर येथील कार्यकर्ते सुनिल केंबळे यांनी खटला दाखल केला आहे. या खटल्यात पंचगंगा नदी प्रदुषणाचा मुद्दाही लवादाने समाविष्ट करुन घेतला आहे. या खटल्याची प्रत्येक महिन्याला सुनावणी होत आहे. मागिल महिन्यात

 

 

Web Title: Municipal corporation order to pay 50 lacs performance guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.