महापालिकेने भरले तब्बल पाच कोटी वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:24 AM2021-03-16T04:24:16+5:302021-03-16T04:24:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महावितरणच्या वीज बिलाचा नियमित भरणा करणाऱ्या कोल्हापूर महापालिकेने पथदिव्यांचे वीज बिल ४ कोटी ...

Municipal Corporation paid a staggering five crore electricity bill | महापालिकेने भरले तब्बल पाच कोटी वीज बिल

महापालिकेने भरले तब्बल पाच कोटी वीज बिल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महावितरणच्या वीज बिलाचा नियमित भरणा करणाऱ्या कोल्हापूर महापालिकेने पथदिव्यांचे वीज बिल ४ कोटी ५० लक्ष रुपये व पाणीपुरवठ्याचे ५२ लक्ष रुपये भरणा केला आहे. मार्चअखेर चालू आर्थिक वर्षात कोल्हापूर महापालिकेने वीज बिलाची थकबाकी शून्य करून महावितरणच्या वसुली मोहिमेस प्रतिसाद दिला आहे.

महावितरणच्या कोल्हापूर मंडळातील २ लाख ९३ हजार ९७७ ग्राहकांनी ४१ कोटी ८५ लाख रुपये वीज बिलाचा भरणा करून महावितरणच्या वीज बिल वसुली मोहिमेस प्रतिसाद दिला. त्यातील ७९ हजार ५४८ वीज ग्राहकांनी ७ कोटी ७५ लक्ष रुपये ऑनलाइन पद्धतीने बिल भरले आहे. २ लाख १४ हजार ४२९ वीज ग्राहकांनी ३४ कोटी ११ लाख रुपये वीज बिल भरणा केंद्राद्वारे भरले आहेत. जानेवारीअखेरपर्यंत ग्राहकांना वीज बिलाची थकबाकी असतानाही अखंडित सेवा दिली. एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला नाही. मात्र, महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता थकबाकी वसुली आवश्यक आहे. ग्राहकांसाठी हप्त्यात वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून दिलेली आहे. तरी ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

चावरे ग्रामपंचायतीने भरले ३ लाख ७१ हजार

चावरे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याचे ३ लक्ष ७१ हजार रुपयांचे वीज बिल भरले आहे. उपविभागीय अभियंता विनोद माने हे सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. कोडोली उपविभाग थकबाकीमुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Web Title: Municipal Corporation paid a staggering five crore electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.