वडगावात पालिकेने टेस्टिंग सेंटर सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:02+5:302021-04-24T04:25:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : वडगावात कोरोनाचे दररोज रुग्ण सापडत असून शतकाकडे वाटचाल सुरू आहे. खासगी कोरोना सेंटर सुरू ...

Municipal Corporation should start testing center in Wadgaon | वडगावात पालिकेने टेस्टिंग सेंटर सुरू करावे

वडगावात पालिकेने टेस्टिंग सेंटर सुरू करावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : वडगावात कोरोनाचे दररोज रुग्ण सापडत असून शतकाकडे वाटचाल सुरू आहे. खासगी कोरोना सेंटर सुरू होण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र पालिकेने विविध रुग्णालयांत राखीव खाटांची संख्या असली तरी, गोरगरिबांना आधार देण्यासाठी शहरात रॅपिड अँटिजेन व कोरोना सेंटर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

सात ते अकरा वाजेपर्यंत शहरातील मिनी बाजार भरलेला असतो. यामध्ये भाजी विक्रेते एस.टी. स्टॅंडसमोरील रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यामध्ये कोणतेही सोशल डिस्टन्स पाळण्यात येत नाही. येथे मिनी बाजार भरला जातो. नंतरही तुरळक प्रमाणात ठिकठिकाणी ठाण मांडले जाते.

तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण घेण्यासाठी मोठी झुंबड उडत आहे. दररोज दीडशेहून अधिक जणांना लसीकरण करण्यात येत आहे.

शहरात इतर वेळेतही अनेकजण कोणतेही कारण नसताना बेदरकारपणे बाहेर फिरत असतात. त्यामुळे वारंवार रोखायचे कोणाला, कारवाई कोणावर करायची, हा प्रश्न आहे.

दरम्यान, आज कोरोनाचे १० रुग्ण मिळून आले. दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचे संक्रमण सुरूच आहे. आजअखेर शहरातील रुग्णसंख्या ९८ झाली आहे. यामध्ये सक्रिय रुग्णसंख्या ४८ झाली आहे.

शहरातील कोरोना रुग्णालयासाठी नऊ जणांनी परवानगी घेतली आहे. यामध्ये काहीजण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पुढे आहेत. शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांतील खाटा राखीव आहेत.

या पार्श्वभूमीवर शहरातील रॅपिड अँटिजेन टेस्ट व कोरोना रुग्णालय होण्यासाठी पालिकेने पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Municipal Corporation should start testing center in Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.