महापालिकेने सर्व व्यापारी, कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी लवकर शिबिर घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:28 AM2021-08-24T04:28:01+5:302021-08-24T04:28:01+5:30
‘कोल्हापूर चेंबर’ ही संघटना कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच महापालिका प्रशासनास साथ देत आली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर आता सर्व ...
‘कोल्हापूर चेंबर’ ही संघटना कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच महापालिका प्रशासनास साथ देत आली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर आता सर्व व्यापार सुरळीत चालू झाला असल्याने सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकर करून घेण्याची ग्वाही आम्ही देतो. सन २०१९ आणि २०२१ मध्ये आलेला महापूर व कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे व्यापारीवर्ग आधीच डबघाईला आला आहे. त्यातच लस न घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर परवाना रद्दसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. ती कारवाई न करता १८ ते ४५ या वयोगटातील दुकानदार, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिर लवकर आयोजित करावे, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी कोल्हापूर चेंबरचे सचिव धनंजय दुग्गे, संचालक अजित कोठारी, राहुल नष्टे, प्रशांत शिंदे, संपत पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
परवाना नूतनीकरण मुदत वाढवावी
व्यवसाय परवाना नूतनीकरण करून घेण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. सर्व व्यापार आत्ताच चालू झाल्याने आठ दिवसांत व्यवसाय परवाना नूतनीकरण करून घेणे शक्य नाही. त्यामुळे व्यवसाय परवाना नूतनीकरणाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली.
फोटो (२३०८२०२१-कोल- चेंबर निवेदन) : कोल्हापुरात सोमवारी महापालिकेच्यावतीने व्यापारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकर करावे, या मागणीचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना दिले.
230821\23kol_5_23082021_5.jpg
फोटो (२३०८२०२१-कोल- चेंबर निवेदन) : कोल्हापुरात सोमवारी महापालिकेच्यावतीने व्यापारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकर करावे, या मागणीचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना दिले.