महापालिका, फेरीवाल्यांमध्ये होणार संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:23 AM2021-02-07T04:23:27+5:302021-02-07T04:23:27+5:30

कोल्हापूर : महापालिकेकडून शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर उद्या, सोमवारपासून कारवाई करण्याचे नियोजन आहे. सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीचा याला विरोध आहे. ...

Municipal Corporation, there will be conflict between peddlers | महापालिका, फेरीवाल्यांमध्ये होणार संघर्ष

महापालिका, फेरीवाल्यांमध्ये होणार संघर्ष

Next

कोल्हापूर : महापालिकेकडून शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर उद्या, सोमवारपासून कारवाई करण्याचे नियोजन आहे. सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीचा याला विरोध आहे. यामुळे प्रशासन आणि फेरीवाले यांच्यात संघर्ष अटळ आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे रजेवर असून, त्या सोमवारी येणार आहेत. त्यांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा आहेत.

शहरातील अनधिकृत केबिन्स, फेरीवाले व अतिक्रमण केलेल्या दुकानदारांवर महापालिका सोमवारपासून जप्तीची कारवाई करणार आहे. तसे त्यांच्याकडून नियोजनही झाले आहे. मंदिरे, हॉस्पिटल या परिसरातील १०० मीटरमधील अतिक्रमण हटवणार आहेत. या कारवाईला फेरीवाल्यांनी विरोध केला आहे. त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडे धाव घेतली आहे. त्यांनी प्रशासनाला कारवाई न करण्याची सूचना केल्याचे समजते. आमदार चंद्रकांत जाधवही यासंदर्भात सोमवारी प्रशासक डॉ. बलकवडे यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. या बैठकीकडे सर्व फेरीवाल्यांचे लक्ष आहे.

चौकट

महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण कारवाईसाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. १०० कर्मचारी, जेसीबी, ट्रक, डंपर, टॅक्टर अशी यंत्रणा तयार ठेवली आहे. दुकानांच्या समोर १ मीटर बाय १ मीटरच्या पुढे रस्त्यावरील अतिक्रमण हटवले जाणार आहे. सोमवारी प्रशासकाचा आदेश मिळताच अनधिकृत फेरीवाल्यांवर हातोडा टाकला जाणार आहे.

फेरीवाला समितीची बैठक झालेली नाही. फेरीवाला झोन निश्चित नाही. बायोमेट्रिक कार्ड वाटप केलेले नाहीत. असे असताना फेरीवाल्यांवर कारवाई केल्यास खपवून घेणार नाही. फेरीवाला समितीला विश्वासात घेऊनच प्रशासनाने निर्णय घेतला पाहिजे.

आर. के. पोवार, निमंत्रक, सर्वपक्षीय कृती समिती

चौकट

एकीकडे महापालिका प्रशासन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे नियोजन करत आहे. दुसरीकडे सिद्धाळा गार्डन येथे शनिवारी एका फेरीवाल्याने मोठे मंडप उभारून दिमाखात व्यवसाय सुरू केला. याची चर्चा मात्र शहरात सुरू आहे.

Web Title: Municipal Corporation, there will be conflict between peddlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.