पालिका कर्मचारी, कुटुंबीयांना कोरोना लस देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:24+5:302021-05-25T04:29:24+5:30

इचलकरंजी : येथील नगरपालिका कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना लस देण्यास टाळाटाळ केला जात असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष रवी ...

Municipal employees avoid giving corona vaccine to their families | पालिका कर्मचारी, कुटुंबीयांना कोरोना लस देण्यास टाळाटाळ

पालिका कर्मचारी, कुटुंबीयांना कोरोना लस देण्यास टाळाटाळ

Next

इचलकरंजी : येथील नगरपालिका कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना लस देण्यास टाळाटाळ केला जात असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी केला. तसेच आरोग्य सभापती संजय केंगार व आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांना धारेवर धरले.

कोरोना काळात नगरपालिकेचे सर्व कर्मचारी स्वत:चा व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. काही प्रमाणात कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना लस देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही काहीजणांना लस दिलेली नाही. प्रशासनाचे लसीकरणात दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत आरोग्य सभापती व आरोग्य अधिकारी यांना रवी रजपुते सोशल फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारत धारेवर धरले. दरम्यान, सभापती व अधिकारी यांनी, नगरपालिकेलाच दहा दिवस लस उपलब्ध झाली नाही. बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून, लसीच्या उपलब्धतेनुसार उर्वरितांनाही लवकरच लसीकरण दिले जाईल, अशी ग्वाही दिली.

Web Title: Municipal employees avoid giving corona vaccine to their families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.