नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:09+5:302021-09-02T04:53:09+5:30

नगरपरिषदांना सहाय्यक अनुदान वेळेवर मिळत नाही. तसेच ते अपुरे मिळते ते सहायक अनुदान वाढवून व वेळेत मिळावे, लाड पागे ...

Municipal employees postpone strike | नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन स्थगित

नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन स्थगित

Next

नगरपरिषदांना सहाय्यक अनुदान वेळेवर मिळत नाही. तसेच ते अपुरे मिळते ते सहायक अनुदान वाढवून व वेळेत मिळावे, लाड पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे सफाई, कर्मचारी याची नोकरभरती सुरू करावी, १०, २० व ३० वर्षेची कालबद्ध पदोन्नती मिळावी, ७ व्या आयोगातील फरक मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी सर्व कामगार कृती समितीने १ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांचे सकाळी नऊ वाजता नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत काम बंद आंदोलन सुरू केले. या वेळी कर्मचाऱ्यांनी कामगार एकजुटीचा विजय असो, आमच्या मागण्या मान्य करा, अशा घोषणा दिल्या. सकाळपासून कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सर्व कर्मचाऱ्यांनी पालिकेचे कामकाज बंद ठेवत काम बंद आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. या वेळी अनेक मान्यवरांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. दुपारी नगराध्यक्षा स्वामी यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केले. या वेळी आरोग्य सभापती संजय केंगार, शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे, कृती समितीचे आण्णासाहेब कागले, के. के. कांबळे, शिवाजी जगताप यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Municipal employees postpone strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.