नगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हालचाल रजिस्टरला नोंदी कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:54+5:302021-07-10T04:16:54+5:30
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कार्यालयीन कामकाजाचे वेळापत्रक ठळकपणे लावावे. त्यामुळे नागरिकांना अडचणी येणार नाहीत, तसेच सर्व विभागप्रमुख ...
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कार्यालयीन कामकाजाचे वेळापत्रक ठळकपणे लावावे. त्यामुळे नागरिकांना अडचणी येणार नाहीत, तसेच सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी हालचाल रजिस्टरला नोंदी कराव्यात, असे आदेश मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिले.
कोरोनाकाळात आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा, अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जातात. त्यामुळे महत्त्वाचे काम असलेले नागरिक नगरपालिकेत आल्यानंतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतात, अथवा वेळ निश्चित नसते. परिणामी, नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने मुख्याधिकारी ठेंगल यांनी शुक्रवारी आदेश दिले.
आदेशात, कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी निश्चित करण्यात आली आहे. या वेळेचा फलक मुख्य प्रवेशद्वारावर लावण्याचे, तसेच कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोंद करणे, आदी सूचना देण्यात आल्या आहेत.