महापालिका आरक्षण-शहरातील ६० प्रभागांवर थेट आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:33 PM2020-12-21T17:33:14+5:302020-12-21T17:51:25+5:30

Muncipal Corporation reservation - कोल्हापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी प्रभाग आरक्षण जाहीर झाले. सोडतीद्वारे आरक्षण जाहीर करण्यात येईल असे आधी जाहीर करण्यात आले होते; मात्र तब्बल ६० प्रभागांवर सोडत न काढताच थेट आरक्षण टाकण्यात आले. केवळ २१ प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आले.

Municipal Reservation- Direct reservation on 60 wards in the city | महापालिका आरक्षण-शहरातील ६० प्रभागांवर थेट आरक्षण

महापालिका आरक्षण-शहरातील ६० प्रभागांवर थेट आरक्षण

Next
ठळक मुद्देमहापालिका आरक्षण - शहरातील ६० प्रभागांवर थेट आरक्षणसोडत काढली २१ प्रभागांचीच

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी प्रभाग आरक्षण जाहीर झाले. सोडतीद्वारे आरक्षण जाहीर करण्यात येईल असे आधी जाहीर करण्यात आले होते; मात्र तब्बल ६० प्रभागांवर सोडत न काढताच थेट आरक्षण टाकण्यात आले. केवळ २१ प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आले.

आरक्षण जाहीर होत असताना उपस्थितांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला; पण तुमच्या सूचना व हरकती द्या त्यावर सुनावणी घेऊ, इतके माफक उत्तर देऊन अधिकाऱ्यांनी अधिक खोलात जाण्याचे टाळले.

आरक्षण सोडत जाहीर करण्याची ही प्रक्रिया येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सुमारे पावणे तीन तास चालली. सभागृहात आसनक्षमतेच्या पन्नास टक्के प्रेक्षकांना बसण्यास परवानगी दिली होती.

राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस, अव्वल सचिव अतुल जाधव व कक्ष अधिकारी प्रदीप परब यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली, तर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, चेतन कोंडे, संदीप घार्गे, निवडणूक अधीक्षक विजय वणकुद्रे यावेळी उपस्थित होते.


प्रारंभी सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी शहरातील १ ते ८१ प्रभागांचे सादरीकरण केले. सर्वप्रथम अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अकरा प्रभागांवर आरक्षण निश्चित करण्यात आले. हे आरक्षण निश्चित करताना त्या त्या प्रभागातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी विचारात घेण्यात आली.

त्याआधारे अकरा प्रभागांची नावे जाहीर करण्यात आली. त्यातून मग सहा प्रभाग याच प्रवर्गातील महिलांसाठी निश्चित करण्यात आले. त्यामध्ये पूर्वी महिलांसाठी आरक्षण नसलेल्या तीन प्रभागांवर थेट आरक्षण टाकण्यात आले, तर तीन प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे करण्यात आले.

१५ प्रभागांवर ओबीसीचे थेट आरक्षण

नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गासाठी २२ प्रभाग निश्चित करण्यात आले. मागच्या तीन निवडणुकीत ज्या प्रभागांवर ओबीसी आरक्षण नव्हते अशा १५ प्रभागांवर थेट आरक्षण जाहीर करण्यात आले, तर सात प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या २२ प्रभागातील अकरा प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यात प्रभाग क्रमांक १३ व प्रभाग क्रमांक २४ वर थेट आरक्षण टाकण्यात आले, तर नऊ प्रभाग सोडतीद्वारी निश्चित करण्यात आले.

फक्त दोनच प्रभागांत सर्वसाधारण महिलांसाठी सोडत -

सर्वसाधारण प्रवर्गासाठी सगळ्यात जास्त उत्कंठा लागून राहिलेली होती. अनुसूचित जातीचे अकरा व ओबीसीचे २२ प्रवर्ग निश्चित झाल्यानंतर ४८ प्रभाग आपोआपच सर्वसाधारण झाले. परंतु, त्यातून २४ प्रभागांवर महिलांचे आरक्षण निश्चित केले गेले.

२००५, २०१० व २०१५ च्या निवडणुकीत महिला आरक्षण नसलेले २४ प्रभाग त्यासाठी पात्र ठरविण्यात आले. २२ प्रभागावर यापूर्वी महिला आरक्षण नव्हते त्या प्रभागावर थेट सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित केले, तर केवळ दोन प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे जाहीर केले.

अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ण होईपर्यंत कसलीच उत्सुकता नव्हती; परंतु ओबीसी व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित केले जात होते, तेव्हा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत गेली. परंतु, ही उत्कंठा पुढे काही वेळातच संपुष्टात आली.

सभागृहात उपस्थित असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यांवर उत्साह फुललेला दिसून आला; पण ज्यांचे प्रभाग गेले त्यांच्या चेहऱ्यावर मात्र तीव्र नाराजी दिसून आली. शेवटी आभार प्रदर्शन विनायक औंधकर यांनी मानले.

 

प्रभागनिहाय आरक्षण यादी -

१. शुगर मिल - सर्वसाधारण महिला
२. कसबा बावडा पूर्व बाजू - सर्वसाधारण महिला
३. कसबा बावडा हनुमान तलाव - सर्वसाधारण महिला
४. कसबा बावडा लाईन बाजार - सर्वसाधारण
५. लक्ष्मी विलास पॅलेस - सर्वसाधारण महिला
६. पोलीस लाईन - सर्वसाधारण
७. सर्कीट हाऊस - अनुसूचित जाती - पुरुष
८. भोसलेवाडी कदमवाडी - अनुसूचित जाती - पुरुष
९. कदमवाडी - सर्वसाधारण
१०. शाहू कॉलेज - सर्वसाधारण महिला
११. ताराबाई पार्क - सर्वसाधारण महिला
१२. नागाळा पार्क - सर्वसाधारण महिला
१३. रमण मळा - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
१४. व्हीनस कॉर्नर - सर्वसाधारण महिला
१५. कनान नगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
१६. शिवाजी पार्क - अनुसूचित जाती महिला
१७. सदर बाजार - सर्वसाधारण
१८. महाडिक वसाहत - नागरिकांचा मागासवर्ग पुरुष
१९. मुक्त सैनिक वसाहत - अनुसुचित जाती महिला
२०. राजर्षी छत्रपती मार्केट यार्ड - अनुसूचित जाती पुरुष
२१. टेंबलाईवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
२२. विक्रमनगर - नागरिकांचा मागासवर्ग पुरुष
२३. रुईकर कॉलनी - नागरिकांचा मागासवर्ग पुरुष
२४. साईक्स एक्सटेंशन - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
२५. शाहपुरी तालीम - नागरिकांचा मागासवर्ग पुरुष
२६. कॉमर्स कॉलेज - नागरिकांचा मागासवर्ग पुरुष
२७. ट्रेझर ऑफीस - सर्वसाधारण
२८. सिद्धार्थ नगर - सर्वसाधारण महिला
२९. शिपुगडे तालीम - सर्वसाधारण
३०. खोलखंडोबा - अनुसूचित जाती महिला
३१. बाजारगेट - सर्वसाधारण
३२. बिंदू चौक - सर्वसाधारण महिला
३३. महालक्ष्मी मंदिर - सर्वसाधारण
३४. शिवाजी उद्यमनगर - सर्वसाधारण महिला
३५. यादवनगर - सर्वसाधारण
३६. राजारामपुरी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
३७. राजारामपुरी - तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल - सर्वसाधारण
३८. टाकाळा खण माळी कॉलनी - नागरिकांचा मागास वर्ग पुरुष
३९. राजारामपुरी एक्स्टेन्शन - सर्वसाधारण महिला
४०. दौलतनगर - अनुसूचित जाती महिला
४१. प्रतिभानगर - सर्वसाधारण महिला
४२. पांजरपोळ -सर्वसाधारण
४३. शास्त्रीनगर- जवाहरनगर - सर्वसाधारण महिला
४४. मंगेशकरनगर - सर्वसाधारण महिला
४५. कैलासगडची स्वारी मंदिर - सर्वसाधारण महिला
४६. सिद्धाळ गार्डन - सर्वसाधारण
४७. फिरंगाई - सर्वसाधारण
४८. तटाकडील तालीम - सर्वसाधारण
४९. रंकाळा स्टँड - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५०. पंचगंगा तालीम - नागरिकांचा मागास प्रवर्ग
५१. लक्षतीर्थ वसाहत - सर्वसाधारण
५२. बलराम कॉलनी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५३. दुधाळी पॅव्हेलियन - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५४. चंद्रेश्वर - सर्वसाधारण
५५. पद्माराजे उद्यान - सर्वसाधारण महिला
५६. संभाजीनगर बसस्थानक - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५७. नाथा गोळे तालीम - सर्वसाधारण महिला
५८. संभाजीनगर - सर्वसाधारण महिला
५९. नेहरुनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग - पुरुष
६०. जवाहरनगर - सर्वसाधारण महिला
६१. सुभाषनगर - सर्वसाधारण
६२. बुद्धगार्डन - अनुसूचित जाती पुरुष
६३. सम्राटनगर - सर्वसाधारण
६४. शिवाजी विद्यापीठ - कृषी महाविद्यालय - नागरिकांचा माागास प्रवर्ग महिला
६५. राजेंद्रनगर - सर्वसाधारण महिला
६६. स्वातंत्र्य सैनिक कॉलनी - सर्वसाधारण
६७. रामानंदनगर- जरगनगर - अनुसुचित जाती महिला
६८. कळंबा फिल्टर हाऊस - सर्वसाधारण
६९. तपोवन - सर्वसाधारण महिला
७०. राजलक्ष्मीनगर - सर्वसाधारण
७१. रंकाळा तलाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
७२. फुलेवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
७३. फुलेवाडी रिंगरोड - नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
७४. सानेगुरुजी वसाहत - सर्वसाधारण
७५. आपटेनगर तुळजाभवानी - अनुसूचित जाती महिला
७६. साळोखेनगर - सर्वसाधारण
७७. शासकीय मध्यवर्ती कारागृह - सर्वसाधारण
७८. रायगड कॉलनी - बाबा जरगनगर - सर्वसाधारण
७९. सुर्वेनगर - अनुसुचित जाती पुरुष
८०. कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
८१. क्रांतिसिंह नाना पाटील, नगर जिवबा नाना पार्क - सर्वसाधारण महिला.

Web Title: Municipal Reservation- Direct reservation on 60 wards in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.