मुलांसाठी आनंदाची बातमी...परीक्षा होणार नसल्या तरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:59 AM2020-04-28T10:59:14+5:302020-04-28T11:07:19+5:30

जगभरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशात ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा प्रभाव शिक्षण क्षेत्रावरदेखील दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालये यांसह अन्य शिक्षण संस्थांचे कामकाज दि. २४ मार्चपासून बंद पडले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची प्राथमिक शिक्षण समितीदेखील अपवाद राहिलेली नाही.

Municipal school annual examination canceled | मुलांसाठी आनंदाची बातमी...परीक्षा होणार नसल्या तरी !

मुलांसाठी आनंदाची बातमी...परीक्षा होणार नसल्या तरी !

Next
ठळक मुद्देमहापालिका शाळेतील वार्षिक परीक्षा रद्दसर्व शाळेतील शिक्षकांनी दि. १० मे पूर्वी विद्यार्थ्यांचे निकाल द्यायचे आहेत.

 




सर्व विद्यार्थी उत्तीर्ण : सर्वांकष मूल्यमापनावर गुणपत्रिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील शाळेत होणारी वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आली असून, सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापनावर आधारित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा श्रेणीनिहाय निकाल व गुणपत्रिका दि. १० मे पर्यंत देण्याच्या सूचना प्रशासनाकडून सर्व शाळांना दिल्या आहेत.

जगभरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशात ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा प्रभाव शिक्षण क्षेत्रावरदेखील दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालये यांसह अन्य शिक्षण संस्थांचे कामकाज दि. २४ मार्चपासून बंद पडले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची प्राथमिक शिक्षण समितीदेखील अपवाद राहिलेली नाही.

महापालिका शिक्षण समितीकडील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होत असतात. परंतु, कोरोना संसर्गामुळे शाळा बंद झाल्या असून, पुढील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे यावर्षीची वार्षिक परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. स्थानिक पातळीवर शिक्षण समितीमार्फत या परीक्षा घेतल्या जात असतात. पूर्व नियोजनानुसार सहामाही परीक्षा पार पडली; परंतु वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले. देशात दि. ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतरसुद्धा परिस्थिती कशी असेल याचा अंदाज नाही. त्यामुळे शिक्षण समितीने इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षण विभागाच्या नियमानुसार वर्षभर विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन करण्यात येते. विद्यार्थ्याची मानसिकता, कल, रुची, आवड, आकलन, विषयातील ज्ञान, आदी गोष्टी विचारात घेऊन सर्वांकष मूल्यमापन केले जाते. त्यामध्ये टक्केवारी ठरविली जात नाही, तर अ, ब, क अशी श्रेणी निश्चित केली जाते. आता परीक्षा रद्द केल्यामुळे ही सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन पद्धत स्वीकारून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार करण्यात येणार आहे. सर्व शाळेतील शिक्षकांनी दि. १० मे पूर्वी विद्यार्थ्यांचे निकाल द्यायचे आहेत.


शिक्षक करणार सर्वेक्षणाचे काम
कोल्हापुरातील ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या कामाकरिता तहसील कार्यालयाकडून शिक्षकांची यादी मागविली आहे. त्यानुसार २५० शिक्षकांची यादी तयार केली आहे. या शिक्षकांना ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाचे काम करावे लागणार आहे.

- महापालिकेच्या शाळा - ५९
- विद्यार्थी संख्या - १० हजारांहून अधिक
- शिक्षक व कर्मचारी संख्या - ३५०

 

प्रथम सत्रात नियोजनाप्रमाणे परीक्षा झाली; पण कोरोना संसर्गामुळे वार्षिक परीक्षा रद्द केली. एक महिना शाळांचे कामकाज झाले नाही. त्यामुळे सर्वांकष मूल्यांकनावर आधारित निकाल तयार करण्याच्या सूचना सर्व शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. शंकर यादव, प्रशासन अधिकारी 

 

 

 

Web Title: Municipal school annual examination canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.