नगरपालिकांनी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:22 AM2021-02-14T04:22:14+5:302021-02-14T04:22:14+5:30
जयसिंगपूर : जनतेला त्यांच्या नागरी गरजा भागवण्याबरोबरच शहराचे वैभव वाढविण्यासाठी नगरपालिकांनी केवळ शासनाच्या आर्थिक मदतीवर अवलंबून न राहता आर्थिक ...
जयसिंगपूर : जनतेला त्यांच्या नागरी गरजा भागवण्याबरोबरच शहराचे वैभव वाढविण्यासाठी नगरपालिकांनी केवळ शासनाच्या आर्थिक मदतीवर अवलंबून न राहता आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत यापुढे वाढविले पाहिजेत, असे प्रतिपादन नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे राज्याचे आयुक्त किरण कुलकर्णी यांनी केले.
राज्यातील नगरपरिषदांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त कुलकर्णी यांचा दौरा सुरू आहे. आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याशी मुंबई येथे बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे या दौऱ्याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू झाली आहे. बैठकीस जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील प्रमुख उपस्थित होते,
शिरोळ तालुक्यामधील जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड या नगरपरिषदांची आढावा बैठक जयसिंगपूर नगरपालिकेत पार पडली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी टीना गवळी, तैमुर मुल्लाणी, निखिल जाधव, नगरसेवक संभाजी मोरे, शिवाजी कुंभार, संजय पाटील-कोथळीकर, दादासाहेब पाटील-चिंचवाडकर, राहुल बंडगर, शैलेश चौगुले, राजेंद्र झेले, अर्जुन देशमुख, पवन म्हेत्रे, राजेंद्र महिंद्रकर, राजेंद्र गवळी आदी उपस्थित होते.
फोटो -१३०२२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे राज्याचे आयुक्त किरण कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, अमरसिंह पाटील उपस्थित होते.