नगरपालिकेने डेंग्यू आजारावर तातडीने उपाययोजना करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:23+5:302021-06-26T04:17:23+5:30
निवेदनात, कोरोना संसर्गजन्य आजारातून शहर सावरत असताना डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. काही दिवसांपूर्वी दोन युवकाचा व एका ...
निवेदनात, कोरोना संसर्गजन्य आजारातून शहर सावरत असताना डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. काही दिवसांपूर्वी दोन युवकाचा व एका महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयजीएम हॉस्पिटल अद्यापही कोविड केंद्र असल्याने सर्वसामान्य नागरिकांना डेंग्यूवर उपचार घेणे अवघड बनले आहे. पालिकेकडून शहराच्या सर्व भागामध्ये स्वच्छता करणे गरजेचे आहे. मात्र, खासगी ठेकेदारामार्फत स्वच्छता होत असल्याने आवश्यक त्या प्रमाणात कर्मचारी नेमले जात नाहीत. त्यामुळे कचरा व्यवस्थापनचा प्रश्न निर्माण होत आहे. याच्या सूचना संबंधित ठेकेदार व पालिका कर्मचा-यांना तातडीने देऊन शहराच्या सर्व भागामध्ये धूर फवारणीसह डेग्यू आजारावरील औषधे आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करावीत, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात नगरसेवक शशांक बावचकर, बाबासाहेब कोतवाल, प्रशांत लोले, मीना बेडगे, प्रमिला पाटील, आदींचा समावेश होता.