शिरोली, हुपरीच्या लवकरच नगरपालिका

By admin | Published: December 28, 2014 12:22 AM2014-12-28T00:22:28+5:302014-12-28T00:23:56+5:30

लढ्याला यश : मार्च २०१५ पर्यंत मंजुरी मिळणार; मिणचेकर, महाडिक यांची माहिती

The municipality soon after the Shiroli, Hupri | शिरोली, हुपरीच्या लवकरच नगरपालिका

शिरोली, हुपरीच्या लवकरच नगरपालिका

Next

सतीश पाटील ल्ल शिरोली
हातकणंगले तालुक्यातील शिरोली आणि हुपरी या दोन्ही गावांची ‘क’ वर्ग नगरपालिका मंजुरी अंतिम टप्प्यात असून, ही दोन्ही प्रकरणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीसाठी प्रलंबित आहेत. मार्च २०१५ पर्यंत दोन्ही गावांना नगरपालिका मंजुरीची पत्रे मिळतील, असे आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि आमदार अमल महाडिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आमदार मिणचेकर म्हणाले, शिरोली आणि हुपरी या दोन्ही गावांसाठी गेल्या १५ वर्षांपासून नगरपालिकेबाबत मंत्रालयात मागणी होती. हुपरी गावाला मंजुरीबाबत अडचण नव्हती; पण शिरोलीसाठी हद्दवाढीचा मोठा प्रश्न होता. आघाडी शासन असताना हद्दवाढ रद्द झाली आणि त्यानंतर लगेचच सेना-भाजप युतीचे सरकार आले आहे. नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यातील ज्या ज्या ग्रामपंचायतींचे नगरपालिकेसाठी प्रस्ताव आले आहेत.
त्यांना मार्च २०१५ पर्यंत नगरपालिका मंजुरी देण्याचे ठरले आहे आणि त्यात प्राधान्याने शिरोली आणि हुपरी या दोन्ही गावांचा समावेश आहे. या दोन्ही गावांना नगरपालिका सर्वप्रथम मंजुरी मिळणार असून, शिरोलीने गेले वर्षभर हद्दवाढ रद्द होऊन स्वतंत्र नगरपालिकेसाठी प्रचंड मोठा संघर्ष केला आहे.

Web Title: The municipality soon after the Shiroli, Hupri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.