मुरबाडला अधिकारीच बनले गस्ती पथकाच्या वाहनाचे चालक
By admin | Published: May 25, 2017 12:05 AM2017-05-25T00:05:27+5:302017-05-25T00:05:27+5:30
वृक्ष लागवड तसेच संवर्धनासाठी विविध उपाय योजना आखतानाच जंगली लाकडाची कोणत्याही प्रकारे अवैध वाहतूक होऊ नये
दत्ता लोकरे । लोकमत न्यूज नेटवर्क---सरवडे : राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाची माहिती कुणालाही सहजपणे उपलब्ध व्हावी व गावची ओळख जगाच्या नकाशावर व्हावी यासाठी गावचा भूमिपुत्र असलेल्या सुशील कुंभार याने गावची संपूर्ण माहिती संकलित करून वेबसाईट बनविली आहे. त्यामुळे आता केवळ एका क्लिकवर सरवडे गावाची सर्वांगीण माहिती जगाच्या कानाकोपऱ्यांतून पाहता येणार आहे.
राधानगरी तालुक्यातील शिक्षण, व्यापार, धार्मिक, राजकारण या माध्यमांतून सातत्याने चर्चेत असलेले गाव म्हणजे सरवडे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात अनेक कलाकार, कारागीर निर्माण झाले आहेत. गावाची बाजारपेठ पंचक्रोशीतील जनतेची आधार बनली आहे. शिक्षण व क्रीडा क्षेत्रांतही गावची मोठी भरारी आहे. सण, धार्मिक उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात ग्रामस्थ सातत्याने पुढे असतात. राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, कुस्ती मल्ल, शाहीर, चित्रकार, आदींनी गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. जुन्या परंपरा जोपासत नव्या नवलाईची कास धरून वावरणाऱ्या या गावाची माहिती जगाला कळावी यासाठी सुशीलने वेबसाईड बनविली आहे. हहह.रअफश्अऊए.उडट या वेबसाईटमध्ये गावातील दुर्मीळ क्षणांची छायाचित्रे, तसेच विविध वास्तूंची छायाचित्रे समाविष्ट केली असून, गावच्या परंपरा, भूगोल संकलित केला आहे. कला, साहित्य, समाज, उद्योग, राजकारण, शिक्षण क्षेत्रांतील तमाम व्यक्ती आणि वल्ली या सगळ्यांना एकत्रित करून मराठी वेबसाईट बनविली आहे. गावच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या घडामोडींचा उल्लेख आहे.
डिजिटलायजेशन अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम
वेबसाईटसारख्या डिजिटल माध्यमामुळे आपल्याला कुठेही, कधीही विविध प्रकारची इथ्यंभूत माहिती मिळविता येते. गावचा इतिहास, भूगोल यासोबत ग्रामदैवत, सणवार, गावच्या विकासाला हातभार लावणाऱ्या व्यक्तींचा संघर्ष अशा प्रकारे कितीतरी अज्ञात गोष्टींचा मागोवा वाचक यातून घेऊ शकतो. हे माध्यम अतिशय सुलभ तर आहेच शिवाय डिजिटलायजेशन क्रांतीमुळे अधिक सुंदररीत्या चित्ररंगाच्या माध्यमातून जगासमोर मांडता येते.
आपल्या मातृभूमीला जगाच्या नकाशावर ठळकपणे मांडण्याचा ध्यास घेतला. गावातील जुन्या-नव्या गोष्टींचा सांगोपांग आढावा घेऊन त्याचं डिजिटलायजेशन करण्याचा विचार केला. गावाला जगासमोर मांडताना कोणती माहिती जमविता येईल, कशावर जास्त भर देता येईल याचा अभ्यास केला. यातूनच डोंगर-दऱ्यांनी, हिरव्यागार शेतीतल्या रानफुलांनी बहरलेल्या गावचे डिजिटल स्वप्न साकार झाले.
- सुशील कुंभार