इचलकरंजीत कामगारावर खुनीहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 03:06 PM2021-03-19T15:06:01+5:302021-03-19T15:07:21+5:30
CrimeNews Ichlkarnji Kolhapur- दाते मळा येथील इराणी बिल्डींगमध्ये राहणाऱ्या एका कापड गाठी बांधणाºया कामगारावर धारदार शस्त्राने वार करून खुनीहल्ला केला. प्रेमाराम खेमाराम चौधरी (वय ४३) असे त्यांचे नाव आहे. या हल्ल्यात त्यांची पत्नी सुंदरदेवी या किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना बुधवारी (दि.१७) मध्यरात्री घडली. याबाबत गावभाग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
इचलकरंजी : दाते मळा येथील इराणी बिल्डींगमध्ये राहणाऱ्या एका कापड गाठी बांधणाºया कामगारावर धारदार शस्त्राने वार करून खुनीहल्ला केला. प्रेमाराम खेमाराम चौधरी (वय ४३) असे त्यांचे नाव आहे. या हल्ल्यात त्यांची पत्नी सुंदरदेवी या किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना बुधवारी (दि.१७) मध्यरात्री घडली. याबाबत गावभाग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, इराणी बिल्डींग चौथ्या मजल्यावर प्रेमाराम व त्यांची पत्नी सुंदरदेवी राहतात. कापड पेढ्यांवर कापडाच्या गाठी बांधण्याचे काम प्रेमाराम करतात. मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी बिल्डींगच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चौथ्या मजल्यावरील प्रेमाराम यांच्या घरात घुसले. त्यांना झोपेतच चादरीमध्ये गुंडाळून धारदार शस्त्राने डोक्यावर व अंगावर वार केले. यामध्ये त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा तुटला आहे. त्यावेळी हल्लेखोरांना अडविण्याच्या नादात पत्नी सुंदरदेवी यांनाही मारहाण केल्याने त्या किरकोळ जखमी होवून बेशुद्ध पडल्या.
शेजाऱ्यांची चाहूल लागताच हल्लेखोर तेथून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रेमाराम यांना नागरिकांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी, सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी भेट दिली. दरम्यान, हा हल्ला कापड गाठी बांधण्याच्या कारणातून झाला असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. हल्लेखोरांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेण्याचे काम सुरू आहे.