गांधीनगरात परप्रांतीय तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:31 AM2021-07-07T04:31:45+5:302021-07-07T04:31:45+5:30

गांधीनगर : घरभाडे देण्याच्या कारणावरून वाद झाल्याने दोघांनी मद्यधुंद अवस्थेत राजू पातलीया मुजालदा (वय ३०, मूळ रा. सेमलखुट, ...

Murder of a foreign youth in Gandhinagar | गांधीनगरात परप्रांतीय तरुणाचा खून

गांधीनगरात परप्रांतीय तरुणाचा खून

Next

गांधीनगर : घरभाडे देण्याच्या कारणावरून वाद झाल्याने दोघांनी मद्यधुंद अवस्थेत राजू पातलीया मुजालदा (वय ३०, मूळ रा. सेमलखुट, पो. हेलापडवा, ता. झिरन्या, जि. खरगोन, मध्य प्रदेश सध्या रा. शांती प्रकाशनगर झोपडपट्टी गडमुडशिंगी) याचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना गांधीनगर रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. दिनेश शेखडिया गेहलोत (वय २८) व सूरज मांगीलाल गेहलोत (वय १८, दोघेही रा. नांदिया टोपलिया, ता. झिरन्या, जि. खरगोन, मध्य प्रदेश) अशी संशयित आरोपींची नावे असून यापैकी सुरज गेहलोत याला ताब्यात घेतले आहे. मृत राजू ,दिनेश, व सुरज तिघेही मोलमजुरी करणारे परप्रांतीय गडमुडशिंगी येथील शांतीप्रकाशनगरमध्ये भाड्याने राहत होते. सोमवारी रात्री हे तिघेही जेवण्यासाठी एकत्र आले. त्यांच्यात घरभाडे देण्यावरून वादावादी झाली. वादावादी वाढत गेल्याने रागाच्या भरात मद्यधुंद अवस्थेतील दिनेश व सूरजने राजू मुजालदा याच्या डोक्यात दगड घातला. यात राजू जागीच मरण पावला. त्यांनी खुनाचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून संगनमताने राजूचा मृतदेह गांधीनगर रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे रुळावर आणून ठेवला. रेल्वे त्याच्या मृतदेहावरून गेल्यानंतर डोके तुटून धडावेगळे झाल्याची खात्री पटल्यानंतर ते घरी आले.

अन् झाला उलगडा

राजूचा नातेवाईक महेंद्र आत्मज ऐचला बरडे यांने राजू कुठे आहे अशी विचारणा दिनेश व सूरजकडे केली. त्यावर तो मूळगावी मध्य प्रदेशला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. पण या दोघांच्या कपड्यावर असलेले रक्ताचे डाग बर्डे याला दिसले. त्यानंतर सुरज व दिनेशला तुम्ही दोघांनी दारू पिऊन काही त्याच्याबरोबर दगाफटका केला आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी दिनेशने तेथून पळ काढला. मात्र, महेंद्रने संशयित आरोपी सुरजला पकडून ठेवले. सूरजने आम्ही दोघांनीच राजूचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे सांगितले. त्यानंतर बरडे याने गांधीनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

०६ राजू मुजालदा

Web Title: Murder of a foreign youth in Gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.