Kolhapur Crime: पत्नीवर चारित्र्याचा संशय; फिरायला म्हणून घेवून गेला, अन् डोक्यात दगड घातला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 11:44 AM2023-02-07T11:44:37+5:302023-02-07T11:44:57+5:30

बोलण्यात गुंतवून पत्नीच्या डोक्यात घातला दगड

Murder of wife due to suspicion of character in Koparde Kolhapur District | Kolhapur Crime: पत्नीवर चारित्र्याचा संशय; फिरायला म्हणून घेवून गेला, अन् डोक्यात दगड घातला

Kolhapur Crime: पत्नीवर चारित्र्याचा संशय; फिरायला म्हणून घेवून गेला, अन् डोक्यात दगड घातला

Next

प्रकाश पाटील

कोपार्डे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. स्नेहल नितीन अहिवळे (खडकी ता. मंगळवेढा, सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. कोल्हापूर -गगनबावडा  रस्त्यावर बालिंगे पुलानजीक ही घटना घडली. खूनाच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबत घटनास्थळ आणि करवीर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, नितीन दगडू अहिवळे हे आपली पत्नी स्नेहल यांच्यासह गुरुदत्त शुगर वर्क्स टाकळीवाडी येथे ऊस तोडणीचे काम करतात. आपल्या पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय नितीन याच्या मनामध्ये होता. त्यामुळे त्याने काल, सोमवारी रात्री पत्नी स्नेहल हिला फिरायला जाण्याच्या निमित्ताने कोल्हापूर - गगनबावडा राज्यरस्त्यावरील बालिंगे पुलाजवळ घेऊन आला. 

पुलाशेजारी असणाऱ्या सहदेव बाबुराव जांभळे (बालिंगे) यांच्या नदीकाठच्या उसाच्या प्लॉटमध्ये त्याने तिला बोलण्यात गुंतवून शेजारी असणारा बांधावरील मोठा दगड उचलून पत्नीच्या डोक्यात घातला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयित आरोपी नितीन आज सकाळी लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनमध्ये गेला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला करवीर पोलिस ठाण्यात पाठवले. 

करवीर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी याबाबत संबंधित महिलेच्या नातेवाईकांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक  प्रिया पाटील यांनी भेट दिली.  क्राइम ब्रँचचे सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सुजय दळवी, अमोल चव्हाण, योगेश शिंदे यांनी भेट दिली. याबाबत पुढील तपास सुरू आहे

Web Title: Murder of wife due to suspicion of character in Koparde Kolhapur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.