पद्मा चित्रमंदिर चौकात फिरस्त्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:24 AM2021-07-28T04:24:44+5:302021-07-28T04:24:44+5:30
कोल्हापूर : झोपण्याची जागा स्वच्छता करण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून पहिल्या मजल्यावरून ढकलून देऊन फिरस्त्याचा खून केला. नेहमी गजबजलेल्या येथील ...
कोल्हापूर : झोपण्याची जागा स्वच्छता करण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून पहिल्या मजल्यावरून ढकलून देऊन फिरस्त्याचा खून केला. नेहमी गजबजलेल्या येथील पद्मा चित्रमंदिर चौकातील व्यापार संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील साडी सेंटरसमोरील पॅसेजमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही खुनाची घटना घडली. अमर (वय २५, पूर्ण नाव नाही), असे खून झालेल्या फिरस्त्या व्यक्तीचे नाव आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळीच संशयित आरोपी सूरज चंद्रकांत कांबळे (वय ३१) या फिरस्त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी सूरज कांबळे व मृत अमर हे दोघे फिरस्ते असून, दहा वर्षांपासून एकत्र असतात. ते येथील पद्मा चित्रमंदिर चौकातील व्यापार संकुलच्या पॅसेजमध्ये रात्रीच्या वेळी झोपतात. सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता अमर हा व्यापारी संकुलातील पॅसेजमध्ये जेवत होता, नजीक पायरीवर संशयित सूरज हाही बसला होता. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. सूरज याने अमरला, ‘तू जेवलेली जागा साफ कर, तेथेच मला झोपायचे आहे’, असे सांगितले. त्यावरून अमरने उलट सूरजला, ‘तुझ्या बापाची जागा आहे का?’ असे सुनावले. दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. वाद सोडवण्यासाठी चौकातील चहा विक्रेता साद महमद शेख व त्याचा चुलतमामा वाहीद महात यांनी प्रयत्न केला; पण त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. झटापटीत अमरने सूरज यास दुकानगाळ्याच्या शटरच्या दिशेने ढकलले. त्यानंतर संतप्त सूरजने अमरची गळपट्टी धरून त्याचे डोके पॅसेजच्या ग्रीलवर आपटले. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला खाली ढकलून दिले. तळमजल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमरचा काही क्षणांतच मृत्यू झाला. खून झाल्याचे निदर्शनास येताच साद व वाहीद यांनी फिरस्ता संशयित आरोपी सूरज कांबळेला लक्ष्मीमुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. वाघमोडे करत आहेत.
फोटो नं. २७०७२०२१-कोल-सूरज कांबळे (आरोपी)
270721\27kol_1_27072021_5.jpg
फोटो नं. २७०७२०२१-कोल-सुरज कांबळे (आरोपी)