उचगाव हद्दीत केळी विक्रेत्या महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:20+5:302021-04-28T04:27:20+5:30

मूळ कर्नाटकातील ही महिला कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर केळी विकण्याचा व्यवसाय करत होती. काही महिन्यांपूर्वी लाॅकडाऊन झाल्यानंतर मंजुळाचा पती गावी ...

Murder of a woman selling bananas in Uchgaon area | उचगाव हद्दीत केळी विक्रेत्या महिलेचा खून

उचगाव हद्दीत केळी विक्रेत्या महिलेचा खून

Next

मूळ कर्नाटकातील ही महिला कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर केळी विकण्याचा व्यवसाय करत होती. काही महिन्यांपूर्वी लाॅकडाऊन झाल्यानंतर मंजुळाचा पती गावी गेला होता. मागील आठवड्यात तिचा पती परत आल्यानंतर त्यांच्यामध्ये मंजुळाच्या वर्तणुकीवरून वाद झाला होता. दोन दिवसांपूर्वी हे पती-पत्नी मनाडे मळा, उचगाव येथील अर्धवट अवस्थेतील बांधकामावर राहण्यास आले होते. मंजुळाचे नामदेव नरसिंगराव जवळगे (रा. कागले मळा, गोकुळ शिरगाव) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय तिचा पती बसू याला होता. या कारणांनी मंगळवारी सकाळी मंजुळा आणि बसूमध्ये वाद झाला. यातून बसूने धारदार शस्त्राने मंजुळाच्या डोक्यावर, छातीवर आणि शरीरावर अन्य ठिकाणी सात वार करून तिचे डोके दगडावर आपटले. यातच तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर बसू पसार झाला. दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविली. यानंतर करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलिसांसह घटनास्थळी भेट दिली. संशयिताच्या शोधासाठी पोलिसांनी श्वानपथक पाचारण केले; परंतु श्वान तिथेच घुटमळले. त्यानंतर पोलिसांनी संशयिताच्या शोधार्थ चार तपासपथके कर्नाटक व इतर ठिकाणी रवाना केली. याबाबतची फिर्याद बेळकरी कुटुंबीयांशी संबंधित तानाजी गोपीनाथ मोरे (वय ३२, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, कावळा नाका, कोल्हापूर) यांनी दिली.

फोटो -२७ गांधीनगर खून

ओळ- गांधीनगर मेन रोडवरील उचगाव हद्दीतील याच बिल्डिंगमध्ये खून झाला. त्याची पाहणी करताना करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील व अन्य अधिकारी.

Web Title: Murder of a woman selling bananas in Uchgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.