कामेरीत चुलत्याचा पुतण्याकडून निर्घृण खून

By Admin | Published: May 28, 2016 11:44 PM2016-05-28T23:44:13+5:302016-05-28T23:44:13+5:30

शेतजमिनीचा वाद : बिल्लू श्वानाने शोधला कोयता, दोघे ताब्यात

The murderous murder of the uncle's uncle in the cameraman | कामेरीत चुलत्याचा पुतण्याकडून निर्घृण खून

कामेरीत चुलत्याचा पुतण्याकडून निर्घृण खून

googlenewsNext

इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे शेतजमिनीच्या बांधावरून असलेल्या वादातून चुलत्याचा पुतण्याने चौघांच्या साथीने कोयता आणि कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. बाळासाहेब विष्णू जाधव (वय ५५, रा. शिवाजी पेठ, कामेरी) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता घडली.
पोलिसांनी मुख्य संशयित पुतण्यासह आणखी एकास ताब्यात घेतले आहे. बिल्लू श्वानाने संशयितांनी गुन्ह्यात वापरलेला कोयता पोलिसांना शोधून दिला. याप्रकरणी हल्लेखोर यशवंत आनंदा जाधव (३८, रा. कामेरी) व संजय शिवाजी हवालदार (४९, रा. लाल चौक, इस्लामपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुमित आनंदा जाधव व इतर दोन अनोळखी फरार आहेत. याबाबत बाळासाहेब जाधव यांचा मुलगा संदीप याने फिर्याद दिली आहे.
बाळासाहेब जाधव आणि त्यांचा पुतण्या यशवंत जाधव यांच्यामध्ये शेतजमिनीच्या बांधावरून वाद सुरू आहे. ३० वर्षांपासून ही दोन्ही कुटुंबे विभक्त राहात आहेत. त्यांच्या जमिनीच्या वाटण्याही झाल्या आहेत. बाळासाहेब जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी शेतात सऱ्या सोडल्या आहेत. शुक्रवारी रात्री दहा वाजता जेवण करून बाळासाहेब जाधव शेतातील वस्तीवर झोपण्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा संदीप सकाळी सहा वाजता चहा घेऊन शेतात गेला.
त्यावेळी बाळासाहेब जाधव विहिरीवरील मोटार सुरू करून केळीच्या बागेला पाणी पाजण्याची तयारी करीत होते. चहापान झाल्यावर बाळासाहेब दूध आणण्याकरिता माने वस्तीकडे गेले. यावेळी संदीपने सऱ्या उरजण्याचे काम सुरू केले. तेव्हा पुतण्या यशवंत विहिरीजवळ उभा राहून शेतात सोडलेल्या सऱ्यावरून जाब विचारत होता. तो भांडणाच्या तयारीतही आला होता. बाळासाहेब यांनी संदीपला सांगितले की, त्याच्याशी वाद नको, तू घरी जाऊन फराळाचे साहित्य घेऊन ये, तोपर्यंत मी हौदावर कपडे, अंथरुण-पांघरूण धुऊन घेतो. याचवेळी हल्लेखोर यशवंतची आई सुमन हीसुद्धा शेडजवळ उभी होती. संदीप हा पुन्हा पावणेनऊच्या सुमारास शेतात येत असताना यशवंत हा कोयत्याने बाळासाहेब यांच्यावर वार करीत असल्याचे त्याने पाहिले. तेथे आणखी एकाच्या हातात कुऱ्हाड होती. बाळासाहेब यांच्या डोक्यात, मानेवर, उजव्या खांद्यावर हल्लेखोरांनी खोलवर वार केल्याने ते शेतातील पाटात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मानेवरील वार वर्मी बसल्याने खोल जखम झाली होती. त्यांच्या हाता-पायाची हालचाल सुरू असल्याने संदीपने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक मारली. बाळासाहेबांना वाहनातून खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तेथे संशयितांची चप्पल पडली होती. त्यावर सांगलीचा श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. बिल्लू श्वानाला चप्पलचा वास दिल्यावर ते थेट संशयित यशवंत जाधव यांच्या बंद घरासमोर जाऊन थांबले. तेथून इस्लामपूर-कामेरी रस्त्यावर पन्नास मीटर अंतरावर पडलेला कोयताही त्याने शोधून काढला. शेवटी इस्लामपूर रस्त्याने २०० मीटर अंतरापर्यंत त्याने माग दाखवला. यावेळी मानकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कामाला लावत अवघ्या सहा तासात दोघा संशयितांना ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रताप मानकर करीत आहेत.

Web Title: The murderous murder of the uncle's uncle in the cameraman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.