Kolhapur: मुरगुडमधील ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव भरला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 04:23 PM2023-07-29T16:23:07+5:302023-07-29T17:38:13+5:30
अनिल पाटील मुरगुड : मुरगुड परिसरात गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसाने मुरगुड, यमगे, शिंदेवाडी या गावांना पिण्याचे ...
अनिल पाटील
मुरगुड : मुरगुड परिसरात गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसाने मुरगुड, यमगे, शिंदेवाडी या गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारा ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला. पावसाने उसंत घेतली असली तरी तलावा मधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गतवर्षी पेक्षा पंधरा दिवस उशिरा तलाव भरला असून आता मुरगुड शहरासह यमगे शिंदेवाडी आदी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे.
शहराच्या पूर्वेकडील बाजूस यमगे, शिंदेवाडी, गावच्या हदीमध्ये साधारणता १९२० च्या सुमारास हा तलाव बांधला गेला. तलावाच्या स्थापनेपासून आजपर्यंत मुरगुड शहरासह यमगे शिंदेवाडी या तिन्ही गावांना अव्यहातपणे पिण्यासाठी पाणी पुरवले जाते. त्यामुळे नगरपालिका प्रशासना बरोबर शहरातील नागरिक सुद्धा तलाव भरण्याची आतुरतेने वाट पहात होते. या तलावातून २२५ एकर शेतीसह मुरगूड, शिंदेवाडी, यमगे या गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. मागील आठ दिवसांपासून परिसरात संततधार सुरू असल्याने तलावात पुर्ण क्षमतेने भरला. सांडव्या वरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली आहे.