मुरगुडचा बाजार अनिश्चित काळासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:22 AM2021-04-06T04:22:01+5:302021-04-06T04:22:01+5:30
मुरगूड : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत तसेच जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुरगुड (ता. कागल) येथे दर मंगळवारी भरणारा ...
मुरगूड : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत तसेच जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुरगुड (ता. कागल) येथे दर मंगळवारी भरणारा आठवडा बाजार व पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध जनावरांचा बाजार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पुढील आदेश येईपर्यंत रद्द केल्याची माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे.
शहरात दर मंगळवारी मोठा बाजार भरतो. यादिवशी परिसरातील पन्नास खेड्यांतील शेतकरी भाजीपाला आणि जनावरे घेऊन विक्रीसाठी येतात. शिवाय कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात व्यापारी येतात. शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुमारे सात कोरोना रुग्ण सापडले आहेत. बाजारात मोठी गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने आणि जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश दिल्याने पुढील सूचना मिळेपर्यंत बाजार बंद राहणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.