मुरगूड नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:52 AM2021-09-02T04:52:09+5:302021-09-02T04:52:09+5:30
मुरगूड : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करताना जीवघेणा हल्ला ...
मुरगूड : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करताना जीवघेणा हल्ला करण्यात आला. याच्या निषेधार्थ मुरगूड (ता. कागल) येथील नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत पालिकेच्या दारात प्रचंड घोषणा दिल्या. पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर झालेला हा हल्ला निषेधार्थ घटना असून या दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी कर्मचारी संघटना अध्यक्ष जयवंत गोधडे यांनी केली. याप्रसंगी कॉ. बबन बारदेस्कर, रणजित निंबाळकर, विनायक रणवरे, अमर कांबळे यांनी निषेध व्यक्त केला. मुरगूड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हल्लेखोरांवर कारवाई होण्यासाठी नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर, तानाजी कांबळे, अमर कांबळे, अभियंता प्रकाश पोतदार, अधीक्षक स्नेहल पाटील, लेखापाल अनिकेत सूर्यवंशी, कर निरीक्षक रमेश मुन्ने, भिकाजी कांबळे, दिलीप कांबळे, मारुती शेटी, बाळू शेळके यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ
मुरगूड नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत ठाणे आयुक्त पिंगळे यांच्या मारहाणीचा निषेध केला.