मुरगूड नगरपरिषदेची ९२ टक्के विक्रमी करवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:56+5:302021-04-08T04:23:56+5:30
मुरगूड नगर परिषदेची १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ मधील करवसुलीमध्ये एकत्रित कर-५२ लाख,९ हजार ३००,वृक्ष कर- २ ...
मुरगूड नगर परिषदेची १ एप्रिल २०२० ते
३१ मार्च २०२१ मधील करवसुलीमध्ये एकत्रित कर-५२ लाख,९ हजार ३००,वृक्ष कर- २ लाख ११ हजार ९६५ रु. अग्निशमन कर-१ लाख ६ हजार, १७२ रु. , कचरा शुल्क- ५ लाख, १६ हजार, ८७६ रु. सॅनिटरी -१ लाख, ८४ हजार, ९०५ रु., शिक्षण कर-१५ लाख २६ हजार, १६२ रु., रोजगार हमी - २ लाख १४ हजार, ३९८ रु., पाणीपट्टी कर- २६ लाख, २९६ रु. अशी १ कोटी ६ लाख, ५१ हजार ७४ रु. ची करवसुली झाली आहे. तसेच माजी सैनिक व विधवा पत्नींच्या ३१ कुटुंबांना ६३६५५ रु.ची एकत्रित करात सूट देण्यात आली आहे.
नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्ष हेमलता लोकरे, मुख्याधिकारी संजय गायकवाड, प्रशासकीय प्रमुख स्नेहल पाटील, सर्व नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कर निरीक्षक रमेश मुन्ने, अमोल गवारे, प्रकाश पोतदार, अनिकेत सूर्यवंशी, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर, बाळासो शेळके, स्वप्नील रणवरे, अभिजित कांबळे, दिलीप कांबळे, स्वप्नील बुचडे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्गाने करवसुलीत सहाय्य केले आहे.