मुरगूड पालिकेचा घरोघरी जाऊन लसीकरणाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:15+5:302021-03-19T04:22:15+5:30

मुख्याधिकारी संजय गायकवाड म्हणाले, राज्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत आहे. कोल्हापूर जिल्हा तसेच मुरगूड शहरात कोरोनाचा प्रसार होऊ नये ...

Murgud Municipality's door-to-door vaccination decision | मुरगूड पालिकेचा घरोघरी जाऊन लसीकरणाचा निर्णय

मुरगूड पालिकेचा घरोघरी जाऊन लसीकरणाचा निर्णय

Next

मुख्याधिकारी संजय गायकवाड म्हणाले, राज्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत आहे. कोल्हापूर जिल्हा तसेच मुरगूड शहरात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात लस देण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात सर्वात जास्त लसीकरण मुरगूड ग्रामीण रुग्णालयात झाले आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. ४५ वयाच्या वरील सर्व नागरिकांनी लस घेणे बंधनकारक आहे. याबाबत लोकांत जागृती करण्यासाठी आणि त्यांची नोंदणी करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मोहीम युद्धपातळीवर राबवली जाणार आहे. नागरिकांनी नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष जमादार यांनीही मार्गदर्शन केले.

या बैठकीस सन्हेल पाटील, रेश्मा चौगले, उज्वला शिंदे, समीरा जमादार, शोभा मिसाळ, मयुरी आडव, दीपाली सुतार, संपती मोरबाळे, यशोदा कांबळे, शोभा देवडकर, कल्पना मोहिते, नयना रणवरे, प्रकाश पोतदार, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर, अमोल गवारे आदी प्रमुख उपस्थित होते.

फोटो ओळ :-

मुरगूड नगरपरिषद कार्यालयात महिला बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुख्याधिकारी संजय गायकवाड.

Web Title: Murgud Municipality's door-to-door vaccination decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.