संवेदनशील गावात मुरगूड पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:20 AM2021-01-15T04:20:38+5:302021-01-15T04:20:38+5:30
मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० ...
मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी संचलनामध्ये भाग घेतला. बिद्री येथून या संचलनाची सुरुवात झाली. वाळवे खुर्द, सावर्डे बुद्रुक, मळगे बुद्रुक, नानीबाई चिखली, कापशी, तमनाकवाडा, लिंगणूर, माद्याळ, हळदी, यमगे, हळदवडे आदी गावात हे संचलन पार पडले.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रचंड इर्षा असते. त्यातून वादाचे प्रकार घडतात. काही ठिकाणी तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून अगोदरच परिसरातील ३२ गावांत पोलीस ठाण्याच्यावतीने शांतता बैठकी घेतल्या आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निवडणुका आणि त्यानंतर लागणारा निकाल या दिवशी पोलीस ठाणे हद्दीतील ३२ गावात आपण मोठा बंदोबस्त ठेवणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले.
फोटो ओळ :- ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलिसांनी परिसरातील संवेदनशील गावात संचलन करीत मतदान शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.