जयसिंगपूर स्वीकृतपदी मुसा डांगे, सागर आडगाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:31+5:302021-08-29T04:24:31+5:30

नगरसेवक संभाजी मोरे व गुंडाप्पा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ...

Musa Dange, Sagar Adgane as Jaysingpur sanctioned | जयसिंगपूर स्वीकृतपदी मुसा डांगे, सागर आडगाणे

जयसिंगपूर स्वीकृतपदी मुसा डांगे, सागर आडगाणे

googlenewsNext

नगरसेवक संभाजी मोरे व गुंडाप्पा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ. नीता माने होत्या. डांगे व आडगाणे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी नूतन नगरसेवक यांचा नगराध्यक्षा डॉ. माने व उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी टिना गवळी यांच्यासह शाहू व ताराराणी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते.

चौकट -

सख्खे भाऊ नगरसेवक

काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांचे समर्थक मुसा डांगे यांना नगरसेवकपदी संधी मिळाली. त्यांचे बंधू युनुस डांगे नगरसेवक आहेत. त्यामुळे एकाच घरातील दोघा सख्ख्या भावांना एकाचवेळी नगरसेवक होण्याचा मान मिळाला. दरम्यान, आडगाणे यांची निवड करून नेत्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची पोहोच दिली.

फोटो - २८०८२०२१-जेएवाय-०३-मुसा डांगे, सागर आडगाणे

Web Title: Musa Dange, Sagar Adgane as Jaysingpur sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.